band allowed in wedding ceremony kolhapur 
कोल्हापूर

लग्न होणार आता वाजत गाजत ; मिळालीय 'ही' परवानगी...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनामुळे छोटेखानी विवाह समारंभ झालेत. ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिलेली आहे. या ५० लोकांमध्ये वाजंत्रींचा समावेश केल्यास, विवाह सोहळ्यात वाद्ये वाजवण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.

विवाह समारंभात अनेकजण एकत्र येत असतात. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणे कठीण असते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे विवाह समारंभावर यावर्षी गदा आली. केवळ ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत छोटेखानी विवाह समारंभ पार पाडत आहेत. परिणामी विवाह समारंभात वाद्ये वाजणे बंद झाले होते. वाजंत्री व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला. त्यांना  शासनाने मदत करावी, तसेच सोशल डिस्टिन्सचे पालन करून कार्यक्रमात वाद्ये वादनास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली होती.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभास उपस्थित राहणाऱ्या ५० लोकांच्यामध्ये आयोजकांनी वाजंत्र्याचा समावेश केल्यास, विवाहात वाद्ये वाजवता येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, तसेच सोशल डिस्टिन्सचे पालन वादकांना करावे लागणार आहे. त्यामुळे बँड, बाजा, सनई, हलगी आदी वाद्ये विवाह समारंभात आता वाजणार आहेत.

आमदार जाधव यांच्या मागणीमुळे वाद्य वादनास परवानगी मिळाल्याने वाजंत्री व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.विवाह समारंभातील वातावरण उत्साही होणार आहे.दरम्यान, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पाठपुराव्यामुळेच अडचणीत सापडलेल्या वाजंत्री व्यवसायाला नवसंजीवनी मिळाल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा घडशी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्विटरवर 'पॉर्नबंदी'? अडल्ट कंटेंट ब्लॉक केल्याचा दावा, युजर्सचा संताप

पुण्यात होळीच्या कार्यक्रमावेळी दुर्घटना, लाइटचा गर्डर कोसळून १५ तरुण-तरुणी जखमी; चौघांवर ससूनमध्ये उपचार सुरू

Kolhapur Accident News : कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात, दूध वाहतूक टेम्पोचा ब्रेक फेल; तीन दुचाकीला उडविले

Atharva Birari : नवलच! वयाच्या २२ व्या वर्षी नाशिकचा अथर्व बिरारी झाला 'सीए'; पहिल्याच प्रयत्नात देशात ४० वा!

मुंबईहून दुबईला निघालेलं विमान, उतरण्याआधी आला मिसाइल अलर्ट; हवेतच 'डबल रिवर्स'ची दुर्मिळ घटना, काय घडलं?

SCROLL FOR NEXT