baraimam talim Preserving the tradition of Hindu Muslim unity in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरची हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची परंपरा जपणारी 'ही' तालीम ; हिंदकेसरी मास्टर चंदगीराम इथेच घडले...

संभाजी गंडमाळे

बाराईमाम तालमीच्या आखाड्यात हरियानाचे हिंदकेसरी मास्टर चंदगीराम यांच्यासह अनेक मल्ल घडले. सत्तरच्या दशकात चंदगीराम कोल्हापुरात होते. येथे सुमारे नऊ वर्षांहून अधिक काळ त्यांनी लाल मातीत सराव केला होता. त्यांच्यासह फुटबॉल पैलवान म्हणून ओळख असणारे वस्ताद सदबा वास्कर, रामचंद्र पैलवान आदींच्या मार्गदर्शनाखाली येथे मल्ल घडले. मास्टर चंदगीराम बाराईमाम तालमीच्या आखाड्यात कसा सराव करायचे, याच्या आठवणी माजी महापौर बाबू फरास यांच्यासह ज्येष्ठ मंडळी आजही सांगतात. 

बाराईमाम पंजाला शहरात मानाचे स्थान. त्यामुळे साहजिकच मोहरम हा येथील प्रमुख सण. या सणात मुस्लीमांबरोबरच हिंदू बांधवही मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात. बाराईमाम फुटबॉल क्‍लबनेही एक काळ गाजवला होता. तालमीच्या परिसरात पूर्वी सजीव देखावे आणि नाटकांचे प्रयोगही रंगायचे. हारूण फरास आणि सहकाऱ्यांच्या भूमिका असलेल्या ‘वेड्याचं घर उन्हांत’, ‘बेबंदशाही’ आदी नाटके सादर केली होती. हारूण फरास यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विशेष गाजली होती. किंबहुना आजही त्याच्या आठवणी अनेक जण सांगतात. अशोक कामटे पोलिस अधीक्षक असताना तालमीने मुस्लीम समाजातर्फे भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्ररथ आणि पाच हजारहून अधिक मुस्लीम बांधव व महिलांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्यासह समीर नदाफ, मकसूद जाफर, निसार मोमीन, फारूख मोमीन, सुलतान फरास, नासीर मोमीन, सर्फराज बारगीर, अल्लू मुल्ला, इम्तियाज मुल्ला, चंद्रकांत पाटील, महेश पाटील, सुशांत पोवार, अल्ताप झांजी आदी मंडळी तालमीच्या माध्यमातून सक्रिय आहेत.

असाही सलोखा...

बाराईमाम मोहल्ला येथे एकुलत्या एका मुलीसह राहणाऱ्या अक्काबाई जाधव यांचे तीन वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यानंतर येथील सर्व मुिस्लम बांधवांनी त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले आणि मुलीचीही जबाबदारी घेतली होती. हिंदू असो किंवा मुस्लिम. येथील प्रत्येकाच्या सुख-दुःखात येथील सर्वच जाती-धर्मापलीकडे जाऊन माणूस या एकाच नात्याने मदतीसाठी पुढे येतात. करवीर निवासिनी अंबाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी ताराराणी यांच्या रथोत्सवावर पुष्पवृष्टीची परंपरा निर्माण करणारे बाबासाहेब मुल्लाही याच परिसरातील.  

तालमीला मोठा इतिहास आणि परंपरा आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती अधिक नेटाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो आहे. विविध सणांच्या माध्यमातून हिंदू-मुुिस्लम ऐक्‍यच नव्हे, तर एकूणच सामाजिक वीण अधिक घट्ट करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न 
सुरू आहेत. 
- आदिल फरास

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT