The barren mountains in Kajirane have been damaged cashew trees  
कोल्हापूर

काजिर्णेच्या बारीला वणवा ; काजूंचे झाले नुकसान...

सकाळ वृत्तसेवा

चंदगड - काजिर्णे येथील बारीच्या डोंगराला वणवा लागल्याने जंगलातील झाडांसह काजूच्या झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुपारी एकच्या दरम्यान डोंगराला आग लागल्याने वार्‍यामुळे आणि उन्हामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. या वणव्यात डोंगराला लागून असलेल्या काजूच्या बागेतील झाडांना झळ बसली आहे. काजूच्या ऐन हंगामात आग लागल्याने काजूचा मोहोर जळून खाक झाला आहे. काजिर्णे आणि म्हाळुंगे गावातील काजू बागायतदारांचे यामध्ये नुकसान झाले असून वणव्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. या आगीत विष्णू फाटक (काजिर्णे), एकनाथ कांबळे व मारुती गावडे (म्हाळुंगे) यांच्या काजू बागेचे नुकसान झाले आहे.

बारीच्या डोंगराला अज्ञातांकडून वारंवार आग लावण्यात येत असल्याने काजू बागायतदारांना फटका बसत आहे. डोंगरातील झाडांचेही मोठे नुकसान होत आहे. काजिर्णे गावाला लागून मोठ्या प्रमाणात डोंगरभाग असल्याने याप्रकारच्या आगीत अनेक प्रकारची झाडे जळून खाक होत आहे.
जंगलातील वन्यजीवही यामध्ये जळून ठार झाले आहेत. रान कोंबडी, ससा, पक्षी या आगीत जळून मृत्युमुखी पडले आहेत. 
ही आग विझवण्यासाठी निवृत्ती कांबळे, गोमजी गावडे, एकनाथ गावडे, यांनी प्रयत्न केले.
 
जखमी पक्षांना जीवदान

काजिर्णे गावातील बारीला आग लागल्यानंतर अनेक पक्षी, प्राणी जखमी झाले आहेत. आगीत जखमी झालेले अनेक पक्षांना पाणी देऊन जीवदान देण्याचं काम आग विझवण्यासाठी आलेल्या नागरिकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

Kasaba Borgaon Drowning : चार बहिणीनंतर विकासचा जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झालेला विवाह; कासारी नदीत बुडून 32 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, पन्हाळ्यातील दुर्घटनेने हळहळ

Crime News: पत्नीचे ऐकत नाही म्हणून जावयाला मारहाण; तिघांवर गुन्हा

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: अंतरवालीत स्टेज मंडप हटवल्यानंतर जरांगे पाटलांचे जंगी स्वागत

SCROLL FOR NEXT