कोल्हापूर

चंदगड तालुक्‍यात  130 खासगी डॉक्‍टर कोरोनाच्या लढाईत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या लढाईत शासकीय डॉक्‍टरांना आता खासगी डॉक्‍टरांची मदत होणार आहे. मुंबई, पुणे तसेच परराज्यातून गावाकडे येणाऱ्या आणि क्वारंटाईन होणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी खासगी डॉक्‍टरांवर सोपवली आहे. चंदगड तालुक्‍यात 130 डॉक्‍टरांकडून देखरेख ठेवली जाणार आहे. या कामाचा कोणताही मोबदला मिळणार नाही. सामाजिक सेवा म्हणूनच या कामाची गणती होणार आहे. 


शासनाने लॉकडाऊन शिथील केल्यानंतर पर राज्यात तसेच परगावातून गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना अटी व शर्थी घालून परवानगी दिली आहे. रेडझोनमधून गावाकडे येणारे नागरीक तसेच सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या भागातून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक किंवा घरातच अलगीकरण कक्षात ठेवण्याबाबतच्या सुचना आहेत. गावाकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या विचारात घेता सरकारी आरोग्य यंत्रणा अपुरी पडणार हे निश्‍चित. त्यासाठी खासगी डॉक्‍टरांकडून मदतीचा हात मागितला आहे. तालुका पातळीवर आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन गावातील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांची एक, दोन दिवसातून तपासणी करुन त्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागाला देण्याचे काम खासगी डॉक्‍टरांना करावे लागणार आहे. 

जवळची गावे जोडली 
खासगी डॉक्‍टरांच्या प्रॅक्‍टीसच्या ठिकाणापासून जवळची गावे जोडली आहेत. त्यांनी त्या- त्या गावात एक- दोन दिवसातून जाऊन क्वारंटाईन कक्षातील नागरिकांची आरोग्य तपासणी करायची आहे. संशयात्मक रुग्ण आढळल्यास तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना द्यायची आहे. या निमित्ताने समाजावर ओढवलेल्या संकटात सामाजिक सेवा देण्याची संधी खासगी डॉक्‍टरांना उपलब्ध झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT