कोल्हापूर

आमदार कोरेंसह आवाडे, महाडिकांच्या पॅनेलची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

गेल्यावेळची निवडणूक बिनविरोध झाली होती. आताही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू

कोल्हापूर : वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहावी, यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करून आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विविध पक्ष, नेत्यांचे विविध गट एकत्रित असणाऱ्या पॅनेलची घोषणा केली. येथील खासगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आरोग्यराज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार कोरे, आमदार आवाडे, श्री. महाडिक, राजू शेट्टी, आमदार आमदार सुरेश हाळवणकर यांनी तयार केलेल्या पॅनेलला सर्वांची मान्यता असल्याचेही श्री. कोरे यांनी सांगितले. आमदार कोरे म्हणाले, 'वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्ताने सर्वजण एकत्र आले आहेत. गेल्यावेळची निवडणूक बिनविरोध झाली होती. आताही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आठ दिवसांपूर्वी मी, आवाडे, महाडिक एकत्र बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. इच्छुकांची संख्या जास्त आहे. सर्वांनाच संधी देतो, म्हणून सांगितले होते. सोमवार (१३) उमदेवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनीही आमच्यासोबत राहावे. जे शिल्लक अर्ज आहेत, त्यांनी बिनविरोधसाठी पुढे यावे.’’

शेट्टी सहभागी होणार

विनय कोरे म्हणाले, समितीसाठी बिनविरोध करण्यासाठी राजेंद्र पाटील-यड्रावकर, श्री. हाळवणकर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. शेट्टी यांनी शेतकरी विचार पुढे नेणार असेल तर आपणही मनापासून यात सहभाग घेऊ अशी मान्यता दिली आहे.'

पॅनेल असे :

* विकास संस्थागट : सुरेश पाटील, बाळकृष्ण बोराडे, आण्णासाहेब डिग्रजे, विलास खानविलकर, जगोंडा पाटील, किरण इंगवले, शिवाजी पाटील

* विकास संस्था गट (महिला) : भारती चौगुले, वैशाली मुजावर

* विकास संस्था गट (इतर मागासवर्गीय) : चॉंद मुजावर

* विकास संस्था गट ( भटके-विमुक्त) : धुळगोंडा डावरे

* ग्रामपंचायत गट (सर्वसाधारण) : अभय मगदूम, सुनीता चव्हाण

* ग्रामपंचायत गट (आर्थिक दुर्बल) : वसंतराव खोत

* ग्रामपंचायत गट ( अनुसूचित जाती-जमाती) : नितीन कांबळे

* अडते व्यापारी गट : सागर मुसळे, संजय वाठारे

* हमाल-मापाडी गट : नितीन चव्हाण

केडीसीसी बॅंक बिनविरोध व्हावी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (केडीसीसी) निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. अशी सर्वांची इच्छा आहे. सध्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. यात कोणी माघार घ्यावी, कोणी उमेदवारी अर्ज कायम ठेवावा? हे निश्‍चित होत नाही. तरीही आम्ही सामंजस्याची भूमिका घेऊन हा प्रश्‍न मार्ग लागावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतही यावर चर्चा होईल, असेही श्री. कोरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT