Beating two women on land agreement in kolhapur 
कोल्हापूर

जमिनीच्या वादातून सासू-सुनेला चाबकाने फोडले 

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : नूल (ता. गडहिंग्लज) येथे शेत जमिनीच्या वादातून चाबकाने व लाथाबुक्‍क्‍यांनी केलेल्या मारहाणीत गावातीलच रेश्‍मा शिवलिंग नंदनवाडे (वय 36) व त्यांची सासू विमला जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी वासूदेव नंदनवाडे, कस्तुरी नंदनवाडे, श्रीमती निर्मला माळगी, सरोज चक्रवर्ती यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (ता. 3) दुपारी ही घटना घडली. 

याबाबत पोलिसांनी सांगितले, नंदनवाडे भाऊबंदकीत रामनाथगिरी मठाच्या जमीन वाटणीच्या कारणावरून वाद आहे. गावातील पंचांमार्फत हा वाद सोडवला आहे. जमिनीचे समान हिस्से करून हद्दीचे दगडही मारून दिले आहेत. तरीसुद्धा संशयितांनी पंचांना न जुमानता दादागिरीने हद्दीचे दगड उपसून टाकले. पंचांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पेरणीसाठी मनाई केली असतानाही संशयित पेरणी करीत होते. त्यावेळी रेश्‍मा व विमला यांनी तेथे जाऊन आमच्या हिस्स्यामध्ये पेरणी करू नका, असे त्यांना सांगत होते. त्या वेळी दोघींनाही संशयितांनी अश्‍लिल भाषेत शिविगाळ करून रेश्‍माला ढकलून देत लाथाबुक्‍क्‍यांनी तर वासुदेव याने हातातील चाबकाने विमला यांच्या पाठीत, पायावर व हातावर जोराने मारहाण केली. या घटनेची फिर्याद रेश्‍मा यांनी पोलिसांत दिली आहे. तपास हवालदार श्री. ठिकारे करीत आहेत. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT