The Beginning Of The New Year In Nesari With Social Work Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

नेसरीत जटामुक्तीने नववर्षाची सुरवात

अवधूत पाटील

गडहिंग्लज : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एका महिलेला जटामुक्त करीत नवीन वर्षाची सुरवात केली. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील वैशाली सुनील सुतार या महिलेचे जटानिर्मूलन करण्यात आले. वर्षभरामध्ये संपूर्ण तालुका जटामुक्त करण्याचा निर्धार केला. 

गेल्या काही वर्षांपासून जटानिर्मूलनाची मोहिम "अंनिस'ने हाती घेतली आहे. गडहिंग्लज व नेसरी शाखेतर्फे अनेक महिलांना जटामुक्त केले आहे. सध्या त्या सर्वसामान्यांसारखे जीवन जगत आहेत. प्रबोधनाच्या माध्यमातून हे काम प्रभावीपणे सुरू आहे. दरम्यान, नेसरी येथील वैशाली सुतार यांच्या डोक्‍यावर सात वर्षांपूर्वी जट तयार झाली. केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे त्यांच्या गुंता वाढला. जटांचा हा भार सांभाळणे त्यांना असह्य झाले होते. पण, देवीचा त्रास होईल या भितीपोटी जटा काढल्या जात नव्हत्या. 

अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, गडहिंग्लजचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे, प्रा. पी. डी. पाटील यांनी सुतार यांचे प्रबोधन केले. त्यानंतर गडहिंग्लज येथे त्यांचे जटा निर्मूलन करण्यात आले. सुतार यांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी अलका भोईटे, प्रज्ञा भोईटे, भादवण येथील कार्यकर्ते सुनील सुतार, सुभाष सुतार, शुभांगी सुतार आदी उपस्थित होते. दरम्यान, नवीन वर्षाची सुरवात जटामुक्तीने केली. वर्षभरात संपूर्ण तालुका जटामुक्तीचा निर्धार करण्यात आला. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: CSK विरुद्ध काय प्लॅन केला होता? सूर्यवंशीचा खुलासा; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल म्हणाला, 'केक लावतील म्हणून...'

'माझ्या भावाने मला 'घंटागाडी'....' ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीला घरी काय नावाने हाक मारतात? अभिनेत्री म्हणाली...

Latest Marathi News Live Update : विदर्भात अवकाळी पावसाचा कहर; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

SCROLL FOR NEXT