Beginning to tear down the wall 
कोल्हापूर

रामानंदनगर ओढ्यातील भिंत पाडण्यास सुरवात 

सकाळवृत्तसेवा

जरगनगर : अखेर रामानंदनगर ओढ्यामधील अतिक्रमणात येणारी "ती' भिंत पाडण्यास सुरवात झाली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी आदेश देऊनही ते पाडण्यात आली नव्हती. "सकाळ'मध्ये तसे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका यंत्रणा जागी झाली आणि भिंत पाडण्याचे काम सुरू झाले. 

रामानंदनगरातील ओढ्याला पूर आल्यानंतर साठहून अधिक घरांत पाणी शिरते. रायगड कॉलनीचा पूल ते रामानंदनगर पुलापर्यंतच्या ओढ्याला दोन्ही बाजूनी भिंत बांधण्यात आली आहे. पुलाच्या पुढे असणाऱ्या ओढ्याची रूंदी कमी असल्याने पुलाच्या परिसरात पुराच्या पाण्याचा फुगवटा तयार होतो. घरात पाणी शिरून प्रापंचिक साहित्याचे नुकसान होते. 
काही वर्षांपूर्वी पुलाच्या पुढील भागात अतिक्रमण करून भिंत बांधण्यात आली होती. त्याबाबत नागरिकांची तक्रार होती. नागरिकांनी ही भिंत पाडण्याचे निवेदन श्री. कलशेट्टी यांच्याकडे सादर केले होते. तत्काळ त्यांनी भिंतीची पाहणी करून ती पाडण्याचा आदेश प्रशासकीय बैठकीत दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाचे पालन तत्परतेने झाले नव्हते. पावसाळ्याच्या तोंडावर ही भिंत का पाडण्यात येत नाही, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होता. 

"सकाळ टुडे'मध्ये त्यासंबंधी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. प्रशासनाच्या पातळीवर हालचाली गतीमान होऊन भिंत पाडण्यास सुरवात झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT