Belewadi's soldiers Gave Mallakhamba lessons while the are on vacation Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

सुटीत सैनिक देताहेत मल्लखांबाचे धडे

अशोक तोरस्कर

उत्तूर : सैन्यातून 40 दिवस सुट्टीवर आलेल्या राहुल मारूती शिंत्रे यांनी गावातील शालेय विद्यार्थ्यांना मल्लखांबचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मल्लखांबाबत माहिती मिळत असून गावात मल्लखांबपट्टू तयार होण्यास पुरक वातावरण तयार झाले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे उत्तूर परिसरात कौतूक होत आहे. 

शिंत्रे 2014 साली सैन्यात भरती झाले. त्यांच्या युनिटमध्ये मल्लखांब शिकवले जाते. भरती होण्यापुर्वी त्यांना मल्लखांबाची अजिबात माहिती नव्हती तरीही प्रशिक्षणानंतर ते चांगले मल्लखांब खेळाडू झाले. विविध स्पर्धेत त्यांनी अनेक बक्षीस मिळवली. काही दिवसापुर्वी ते चाळीस दिवसाच्या रजेवर आले. त्यांनी आपला मनोदय गावातील नागरिकांना बोलून दाखवला. उत्तूर विद्यालयातून मल्लखांब आणून प्रशिक्षण सुरू झाले. उपक्रमाची सुरवात गावातील जेष्ठ नागरीक दत्तू पाटील यांच्या हस्ते झाले. प्राथमिक शाळेच्या पटांगणात हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

दृष्टीक्षेपात मल्लखांब 
मल्लखांब हा सामान्यतः आठ फुट उंचीचा, सरळ आणि गुळगुळीत तसेच वरच्या टोकाकडे निमुळता असतो. मलखांब खेळण्याकरता सर्वात उत्तम लाकुड शिसवीचे समजले जाते; कारण ते गुळगुळीत असते. त्याची प्रकृती थंड असते, त्याच्यावर शरीर कवायत करताना घसरले तरी कातडे सोलवटुन निघत नाही, मल्लखांब पुरतांना देखील विशेष काळजी घेतली जाते. खड्डयात वाळू, चुना, विटा टाकायचे आणि खाली तळभागाला डांबराचा जाड थर लावावा लागतो. त्यामुळे त्या लाकडाला वाळवी लागण्याची भिती राहात नाही. मलखांब ज्या ठिकाणी रोवतात तेथील जमीन अत्यंत मऊ केली जाते; त्यामुळे कवायत करताना खेळाडू सहज चढू आणि उतरू शकतो. 

पंधरा वर्ग
कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम देणारा हा खेळ आहे. मल्ल खांबावर कवायतीचे सलामी, अढी, सुईदोरा, तेढी, दसरंग, वेल झाप, फरारे बगली, अवरोहण, ताजवे (तराजु) असे एकुण पंधरा वर्ग घेण्यात येत आहेत. 
- राहुल शिंत्रे, सैनिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT