Belgaum among districts with highest number of deaths in the country 
कोल्हापूर

देशातील सर्वाधिक मृत्यू नोंद झालेल्या 16 जिल्ह्यांमध्ये बेळगावचा समावेश

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव - कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू नोंद झालेल्या देशातील 16 जिल्ह्यांमध्ये बेळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्याचा व मृत्यू दर कमी करण्याचा आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात आता कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्या लागणार आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भातच्या सूचना दिल्या आहेत.

देशातील कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू व तेलंगणा या राज्यांमधील 16 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर जास्त आहे. कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर नगर, गुलबर्गा व उडपी या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. गुजरातमधील अहमदाबाबत व सूरत जिल्ह्यांचा समावेश आहे. तामिळनाडू येथील चेन्नई, कांचीपुरम, राणीपेट, थेणी व थिरूवल्लूर आणि तेलंगणा मधील मेदाचलमलकाजगिरी व हैद्राबाद या दोन जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर जास्त आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांबाबत केंद्रीय आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. 

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी केंद्र सरकाराने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोनाचा देशाचा व देशातील राज्यांचा मृत्यू दर किती आहे याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने घेतली आहे. बेळगावसह 16 जिल्ह्यांमधील मृत्यू दर देशाच्या व राज्याच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या 16 जिल्ह्यांमधील मृत्यूदर कोणत्याही स्थितीत कमी व्हायला हवा असे आरोग्य विभागाला वाटते. बेळगाव जिल्ह्याच्या कोरोना बुलेटीन नुसार 7 ऑगस्ट पर्यंत 93 जणांचा मृत्यू झाला आहे. पण प्रत्यक्षात 209 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ही खरी आकडेवारी केंद्रीय आरोग्य विभागाला कळली तर चिंता वाढण्याची शक्‍यता आहे. या चार राज्यांचे आरोग्य सचिव राष्ट्रीय आरोग्य मिशनचे व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा आरोग्याधिकारी, रोगनियंत्रण अधिकारी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांच्याशी राजेश भूषण यानी संवाद साधला आहे. त्यात कोरोनाबाधीतांवरील उपचाराकडे गांभिर्याने लक्ष देण्यास सांगीतले आहे.

गंभीर आजारांमुळे ग्रासलेले लोक, जेष्ठ नागरीक, गर्भवती महिला, लहान मुले यांच्याकडे विशेष लक्ष देणे, यापैकी कोणी कोरोनाबाधीत आढळले तर त्यांच्यावर विशेष उपचार करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. राज्यात किंवा संबधित जिल्ह्यात कोरोना तपासणीच्या प्रयोगशाळा वाढविणे, कोरोना तपासणीचा वेग वाढविणे, कोरोनाबाधीतांसाठी रूग्णवाहीका वेळेवर उपलब्ध करून देणे, रूग्णवाहीकेची मागणी झाल्यास तातडीने कार्यवाही करणे, खाटांची संख्या वाढविणे, ऑक्‍सीजन सिलिंडरची संख्या वाढविणे या माध्यमातून मृत्यू दर कमी करा असेही संबधित जिल्ह्यांच्या आरोग्य विभागाला सांगण्यात आले आहे. 

संपादन - मतीन शेख
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT