In Belgaum Asha workers started a work stoppage agitation for demands 
कोल्हापूर

बेळगावात 'या' मागण्यांसाठी आशा कर्मचार्‍यांनी छेडले काम बंद आंदोलन...

विनायक जाधव

बेळगाव - मासिक बारा हजार रुपये मानधनासह कोरोना विरोधात कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना आवश्‍यक सुरक्षा साहित्य द्यावे. तसेच कोरोनाचा संसर्ग झाल्यास भरपाईसह संपूर्ण उपचार खर्च शासनाने करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 10) आशा कार्यकर्त्यांनी काम बंद आंदोलन छेडले.

30 जून पासून आशा कार्यकर्त्यांनी विविध मार्गाने आपल्या मागण्यांसाठी शासनाने लक्ष वेधले आहे. तालुका, जिल्हा पातळीवर सांकेतीक आंदोलन यापूर्वी छेडण्यात आले होते. यासह जिल्हाधिकारी आणि लोक प्रतिनिधींना देखिल मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत आशा कार्यकर्ता संघटनेतर्फे शासनाला आपल्या विविध मागण्यांचे दहा निवेदन सादर करण्यात आले आहे. पण, शासनाने या विषयावर चर्चा करण्यासाठी अद्याप एकाही बैठकीचे आयोजन संघटनेसोबत केले नसून मागण्यांकडेही दुर्लक्ष केले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आज सकाळी येथील राणी चन्नम्मा चौकात आशा कार्यकर्ता संघटनेने याविरोधात आवाज उठविला. यानंतर जिल्हा कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

आशा कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आजपासून बेमुदत आंदोलन छेडले असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम जाणवणार आहे. सध्या कोरोना संसर्ग थांबविण्याच्या जबाबदारी आशा कार्यकर्त्यांचे कार्य मोलाचे ठरले आहे. कोरोनाचे सर्व्हेक्षण करण्यासह इतर सर्व आरोग्य सेवेच्या कार्यात आशा कार्यकर्त्या दिवसरात्र काम करीत आहेत. मानधन वाढीसाठी यापूर्वी देखिल आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. सध्या कोरोना योद्धा म्हणून काम करीत असताना देखिल त्यांना योग्य आणि वेळेत मानधन मिळालेले नाही. यासाठी दरमहा बारा हजार रुपये मानधनाची मागणी करीत आशा कार्यकर्ता संघटनेने बेमुदत आंदोलन हाती घेतले आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT