belgaum Bill collector who taking bribe
belgaum Bill collector who taking bribe 
कोल्हापूर

बेळगाव : लाच घेताना बील कलेक्टर लाचलुचपतच्या जाळ्यात 

अमृत वेताळ

बेळगाव : निपाणी पालिकेतील अभियंता आणि ऑपरेटवर यांच्यावर लाच घेताना करण्यात आलेली कारवाई ताजी असतानाच आज (ता.6) सदलगा नगरपंचायतीचा बील कलेक्‍टर एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. अशोक नेमा हेगडे असे त्याचे नाव असून उताऱ्यावरील बोजा कमी करुन नवीन उतारा देण्यासाठी 9 हजारांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. 

संशयिताला अटक करुन जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. 

शिवानंद कुमार करगंळे (रा. सदलगा ता. चिकोडी) यांनी त्याच्या विरोधात एसीबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. श्री. करगंळे यांच्या वलिलांच्या नावावर आश्रय घरकुल मंजूर झाले होते. यापूर्वी मंजूर झालेल्या घरावर असलेला बोजा कमी करुन वडिलांच्या नावावरील नवीन उतारा देण्यासाठी सदलगा नगरपंचायतीचा बील कलेक्‍टर हेगडे याने त्यांच्याकडे बारा हजार रुपयांची लाच मागीतली होती. त्यानंतर नऊ हजार रुपये देण्याचे ठरले होते.

करगंळे यांनी एसीबी पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली होती. त्यानुसार एसीबीचे उत्तर विभागाचे जिल्हा पोलीस प्रमुख बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक शरणाप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक एच. सुनिलकुमार, ए. एस. गोदीगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी करगंळे यांच्याकडून नउ हजार रुपयांची लाच घेताला हेगडेला रंगेहात पकडले.  सलद दुसऱ्या दिवशी एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT