belgaum black day Protesting Marathi speakers are being obstructed by the police 
कोल्हापूर

काळ्या दिनी मराठी भाषिकांची मुस्कटदाबी ; पोलिसांकडून होतेय अडवणूक

मिलिंद देसाई

बेळगाव : काळ्या दिनी मोठ्या संख्येने एकवटणाऱ्या मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरू करण्यात आली असून ठिकठिकाणी निषेध करणाऱ्या मराठी भाषिकांची पोलिसांकडून अडवणूक होत आहे. 


दरवर्षी काळ्या निषेध फेरी काढण्यात येत होती. मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याचे कारण पुढे करीत फेरीला परवानगी नाकारण्यात आल्याने मराठी भाषिकांनी विविध भागात निषेध करण्यास सुरवात केली आहे. मात्र शिवसेनाच्या कार्यालयासमोर निषेध करण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकाना पोलिसांनी अडवत निषेध नोंदविण्यास विरोध करण्यात आला त्यामुळे शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 


तसेच धरणे आंदोलन करण्यात येणाऱ्या मराठा मंदिर येथेही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कार्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. तरीही या ठिकाणी मराठी भाषिक अधिक संख्येने जमण्यास सुरुवात झाली आहे. 

काळ्या दिनी मराठी भाषिकांनी काळे फुगे व पतंग सोडण्याचा निर्णय घेतला होता याची धास्ती घेतलेल्या पोलिसांनी शनिवारी दिवसभर फुगे व पतंग विक्री करणाऱ्या विक्रत्यांना तंबी देत फुगे विक्री करण्यास मनाई करण्यात आली त्यामुळे फुग्यांची धास्ती घेण्यात आल्याचे दिसुन आले

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT