in Belgaum crowded for a week and curfew for sunday 
कोल्हापूर

बेळगावात रविवारी शुकशुकाट तर आठवडाभर गर्दी ; कोरोनाचा संसर्ग रोखणार कसा ?

मिलिंद देसाई

बेळगाव - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दर रविवारी लॉकडाउन घोषित केला आहे तसेच कडक निर्बंध घातले आहेत त्यामुळे नागरीकांकडुन लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे रविवारी संपुर्ण शहरात शुकशुकाट पहावयास मिळाला मात्र सोमवार उजाडताच पुन्हा रस्ते गर्दीने फुलुन जात आहेत त्यामुळे आठवडयातील एक दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग थांबणार का याचा विचार प्रत्येकाने गरजेचे आहे. 

लॉकडाऊनमुळे सलग चौथ्या रविवारीही (ता. 26) सर्व व्यवहार बंद होते तसेच वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाले होते. काही ठिकाणी तुरळक वाहतुक सुरु होती तर काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या युवकांवर पोलिसांनी सकाळपासूनच कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे सकाळपासुनच शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुचाकी वाहनांची वर्दळ पुर्णपणे रोडावली होती. तर लॉकडाउनचा फायदा उठवत काही जण गल्लीच्या कोपऱ्यावर बसुन गप्पा मारताना व विविध प्रकारचे खेळ खेळताना दिसुन येत होते. 

राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने 8 ऑगस्टपर्यंत दर रविवारी लॉकडाउन घोषित केला आहे. त्यामुळे शनिवारी रात्री 8 पासूनच शहरासह जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सकाळपासुनच पोलिस विविध गल्ल्यांमध्ये जाऊन नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना करत होते. त्यामुळे सर्व गल्लींमध्येही शुकशुकाट पाहावयास मिळाल होता. नेहरुनगर, सदाशिवनगर, उद्यमबाग, टिळकवाडी, जुना धारवाड रोड, सीबीटी, गोवावेस, शनिमंदिर, चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, किल्ला, कॅम्प परिसरासह बसवेश्‍वर सर्कल, बॅ.नाथ पै सर्कल शहापूर आदी ठिकाणी पोलिस तैनात केले होते. अनेक ठिकाणी बॅरिकेड्‌स लावून वाहतुकीसाठी रस्ते बंद केले होते. अत्यावश्‍यक सेवा वगळता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. त्यामुळे अनेकांना पोलिसांचा लाठीचा प्रसाद खावा लागला. तसेच बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद असल्याने सर्रास रस्तांवर फक्‍त वाहने पार्क केलेली वाहने दिसुन येत होती. 

गेल्या पंधरा दिवसांपासुन शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन रविवारी कडक लॉकडाउन करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. याची अंमलबजावणी शनिवारी रात्रीपासूनच होत आहे तसेच नागरिकांही त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. मात्र राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्‍यक आहे. परंतु रविवारी लॉकडाऊनमुळे शांत असणारे शहर आठवड्‌यातील इतर दिवस गर्दीने गजबजत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत असुन नागरिकांनी रविवार प्रमाणेच इतर दिवसही काळजी घेणे आवश्‍यक आहे.

संपादन - मतीन शेख


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT