कोल्हापूर

मच्छिमारांवर ओढवली दुर्दैवी वेळ: मुलग्याला वाचविताना युवक बुडाला

मासे पकडणाऱ्या युवकाचा नदीत बुडाला

सकाळ डिजिटल टीम

मांजरी : येथील जुन्या पुलाजवळ कृष्णा नदीत आंघोळ करताना प्रवाहात वाहून जाणाऱ्या मुलग्याला वाचविताना मासे पकडणारा युवक नदीत वाहून गेला. मंगळवारी (ता. १०) ही दुपारी घटना घडली. शरीफ नूरमहंमद खानदाजी (वय ३४ रा. हुक्केरी) असे नदीत वाहून गेलेल्या युवकाचे तर ओंकार सदाशिव मायाण्णावर (वय १२, रा. मांजरी) असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेची नोंद अंकली (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) पोलिस ठाण्यात झाली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,

ओंकार मायण्णावर (वय १२) मित्रांसमवेत आंघोळीस आला होता. कृष्णेच्या वेगवान प्रवाहामुळे तो बुडत असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या युवकांच्या निदर्शनास आले. शरीफ खानदाजी याने तत्काळ नदीत उडी मारून बुडणाऱ्या ओंकारला वाचवण्यात यश मिळविले. मात्र वेगवान प्रवाहामुळे पोहताना दमछाक झाल्याने शरीफ खानदाजी याचा बुडून मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना मित्राचा जीव वाचविण्यात यश मिळाले नाही.

घटनास्थळी पोलिस ठाण्याचे मंडल पोलिस निरीक्षक बी. टी. निलगार यांनी भेट दिली. या घटनेची नोंद अंकली पोलिस ठाण्यात झाली आहे. अंकली येथे वास्तव्यास असलेल्या एनडीआरएफ पथकातील जवानांना बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधासाठी पाचारण करण्यात आले. त्यांचे शोधकार्य सुरू होते. सायंकाळी उशिरापर्यंत बुडालेल्या युवकाचा मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे शोधकार्य थांबविले. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांच्या कोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! महिला वकीलाच्या कृतीमुळे कोर्ट मार्शलला बोलवावं लागलं; पुढचा घटनाक्रम धक्कादायक!

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट ओसरली, मात्र गारठा कायम राहणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान?

Swami Samarth Video: स्वामी समर्थ महाराजांचा गूढ प्रवास! भारत खंडातून फिरताना तयार होतो 'ॐ' आकार... प्रत्येक भक्ताने वाचावी अशी माहिती

Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आज दिल्लीत होणार आगमन ; दौऱ्याकडे जगाचे असणार बारीक लक्ष!

आजचे राशिभविष्य - 04 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT