belgaum police raid on Illegal sale of alcohol 
कोल्हापूर

गावठी मिळणेही बनले कठीण : तळीरामांची झाली गोची 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : लॉकडाउन काळात मद्य विक्रीवर निर्बंध असल्याने तळीरामांची चांगलीच पंचायत झाली आहे. या काळात विदेशी, गोवा बनावटीचे मद्य, काजू आणि गावठी दारुचा सुळसुळाट वाढला आहे. जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करुन करुन देखील बेकायदा मद्याची तस्करी आणि विक्री सुरु असल्याचे दिसून येत असल्याने या धंद्यात गुंतलेल्यांवर कारवाई करण्यासाठी अबकारी आणि पोलीस खात्याच्यावतीने स्वतंत्ररित्या जोरदार कारवाई करण्यात येत आहे. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करुन छापे टाकण्यात येत असल्याने बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

केंद्रसरकारने एक दिवसासाठी जनता कर्फ्यु घोषीत केल्यानंतर मद्यविक्री दुकानदारांना त्याठिकाणी स्वयंमस्फुर्तीने दुकाने बंद केली होती. त्यानंतर 21 दिवसासांठी लॉकडाउन घोषीत करण्यात आल्यानंतर मद्य विक्री दुकानेही बंद ठेवण्यात आली. अनपेक्षिरित्या झालेल्या निर्णयामुळे अनेकांची गोची झाली. जिल्ह्यात ठिकठिकाणी बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांनी मद्याचा साठा करुन त्याची चढ्या दऱ्याने विक्री केली. साठा संपल्यानंतर गोवा बनावटीच्या दारुची तस्करी आणि विक्री जोरात सुरु झाली. गोव्याला भाजीपाला पुरवठा करणाऱ्या मालवाहू वाहनातून गोवा बनावटीच्या दारुची राजरोस तस्करी करण्यात येत आहे. अबकारीचा कणकुंबी येथे तपासणी नाका असून देखील ही वाहने अगदी सहजरित्या शहरात एक होती. ही माहिती मिळताच दोन दिवसापूर्वी उद्यमबाग आणि बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तशा वाहनावर कारवाई करुन मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त केला. विदेशी आणि गोवा बनावटीचे मद्य मिळणे दुरापास्त झाल्याने तळीरामांनी आपला मोर्चा काजू आणि गावठी दारुकडे वळविला आहे. बेळगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील काही गावात काजुची दारु तयार करण्यात येते. दिडशे रुपये लिटर मिळणारी दारु सध्यस्थितीला सहाशे ते सातशे रुपयेला विक्री करण्यात येत आहे. तरीदेखील तळीराम हवी तेवढी रक्‍कम मोजण्यास तयार आहेत. रात्रीच्यावेळी दारुची चोरटी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अबकारी आणि पोलिस खात्याच्यावतीने गावठी आणि काजू दारु व्यवसायात गुंतलेल्यावर कारवाई करण्यात येत आहे. दोन्ही खात्याची पथके दिवसा तसेच रात्रीच्यावेळी देखील गस्त घालून छापेमारी करीत आहेत. परिणामी आता काजू आणि गावठी दारु मिळणेही कठीण बनले आहे. 


लॉकडाउन घोषीत झाल्यापासून अबकारी खात्याच्यावतीने बेकायदा मद्य विक्र व्यवसायत गुंतलेल्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच काजू आणि गावठी दारुची विक्री करणाऱ्यावर छापे टाकून अनेकांना अटक करण्यात आली आहे. 

-मंजुनाथ मेळ्ळीगेरी, अबकारी निरीक्षक


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT