Belgaum youth crime case arrested two boy 
कोल्हापूर

मला सोडून दुसऱ्याबरोबर विवाह करणार याचा राग धरून तरुणीचा खून; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : हारुगेरी (ता. रायबाग) येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा कणकुंबी जंगलात खून करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आदर्श दत्तू पार्थनहळ्ळी व किरण केंचप्पा जगदाळ अशी त्यांची नावे आहेत. तिसरा संशयित अल्पवयीन आहे. वैद्यकीय तपासणीनंतर तिघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी  

हारुगेरीतील एका अल्पवयीन मुलीची आदर्शबरोबर ओळख होती. या ओळखीतूनच आदर्शने नोव्हेंबर २०१९ मध्ये अल्पवयीन मित्राच्या मदतीने तिचे अपहरण केले. आदर्श हा धारवाड येथे शिक्षणासाठी होता. अल्पवयीन मुलीसोबत तो धारवाडमध्येच 
वास्तव्यास होता.

दरम्यान मे २०२० मध्ये त्याने निपाणीजवळील एका गावात आपल्या मित्राच्या पाहुण्यांच्या घरी तिच्या राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र, त्या मुलीने दुसऱ्या एका युवकाशी विवाह करण्याची तयारी केली होती. त्याची माहिती आदर्शला मिळाली होती. मला सोडून दुसऱ्याबरोबर विवाह करणार असल्याचा राग मनात धरुन आदर्शने मित्र किरण व एका अल्पवयीन मुलाच्या साथीने तिच्या खुनाचा कट रचला.आदर्शने वरील दोघांच्या सहकार्याने त्या मुलीला ९ जून २०२० रोजी खानापूर तालुक्‍यातील कणकुंबी जंगलात आणले. तिथे तिला मद्य पाजण्यात आले. त्यानंतर तिचा कोयत्याने गळा चिरण्यात आला.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची जंगलातच विल्हेवाट लावण्यात आली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना करुन शोधकार्य हाती घेतले होते. तिची आदर्शसोबत जवळीक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी १ डिसेंबर रोजी आदर्शला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने तिच्या खुनाची कबुली दिली. खुनासाठी वापरलेली मोटारसायकल, कोयता, मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी तिघाही संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली. तर अल्पवयीनाची रवानगी बालसुधारगृहात झाली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध'; शेतकऱ्यांकडून रास्तारोको, उपकाराची भाषा थांबवावी

दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय! परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात आता सीसीटीव्ही असणार, शाळेची संरक्षक भिंत पक्की असण्याचीही घातली अट

Inspiring Woman: 'पोटात वाढणाऱ्या बाळासह राधिका नरळेंची प्रेरणादायी धाव'; सोलापूरमधील ‘१० के रन’ मॅरेथॉनमध्ये गरोदर असूनही ५ किलोमीटर धावल्या..

Panchang 3 November 2025: आजच्या दिवशी चंद्रकवच स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Laxman Hake: दोन सप्टेबरचा जीआर रद्द करा: लक्ष्मण हाके; आरक्षणाशी संबंध नसणारे विखे उपसमितीचे अध्यक्ष कसे?, दहा टक्क्यांना सरकार घाबरले

SCROLL FOR NEXT