benazir villa in radhanagar kolhapur movement for conveyance in kolhapur
benazir villa in radhanagar kolhapur movement for conveyance in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर : ऐतिहासिक ‘बेनझीर व्हिला’ हस्तांतराच्या हालचाली

मोहन नेवडे

राधानगरी (कोल्हापूर) : ऐतिहासिक हत्तीमहल पाठोपाठ आता राधानगरी लक्ष्मी तलावाच्या मध्यवर्ती असलेला बेनझीर व्हिला वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जलसंपदा विभागाकडून हस्तांतरित करून देण्यासंदर्भातला प्रस्ताव वनविभागाने पाठवला आहे.

वन्यजीव विभागाने याबाबत जतन व संवर्धन योजना प्रस्तावित केली आहे. मूळ वास्तूला धक्का न लावता पडलेल्या भागांची नव्याने बांधणी व पडण्याच्या शक्‍यता असलेल्या भागातील धोकादायक परिसराचे मजबुतीकरण होईल. हस्तांतरानंतर याबाबतचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. सध्या देखभाल व दुरुस्तीअभावी ऐतिहासिक हत्तीमहलची दुरवस्था झाली आहे, तीच गत बेनझीर व्हिलाची आहे. जतन व पुनर्वसन या योजनेमुळे या दोन्ही मूळ रूपात येतील, अशी आशा आहे. यातून हेरिटेज टुरिझम योजनेला मूर्त स्वरूप येणार आहे.

राधानगरी ‘लक्ष्मी’ जलाशयाच्या मध्यवर्ती असलेल्या बेटावर बेनझीर व्हिला आहे. पूर्वी शिकार किंवा धरणाच्या बांधकामावर नजर ठेवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी याची निर्मिती केली असावी, असा अंदाज बांधला जातो. धरणातील पूर्ण पाणीसाठा कमी झाल्यानंतर राऊतवाडीकडून या ऐतिहासिक वास्तूकडे जाण्यासाठी मार्ग खुला होतो. गेल्या दहा वर्षांत तीन वेळा ही संधी पर्यटकांना उपलब्ध झाली. त्या काळात मोठ्या संख्येने ही वास्तू पाहण्यासाठी पर्यटक याकडे आकर्षित झाले होते. तेव्हापासून यांचा पर्यटन स्थळासाठी विकास व्हावा म्हणून हालचाली सुरू 
झाल्या. 

ही ऐतिहासिक वास्तू आपल्या ताब्यात मिळावी व ती हस्तांतरित करावी, तसा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे वन विभागाने पाठवला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हेरिटेज टुरिझम योजनेला मूर्त स्वरूप येईल. या वास्तूपर्यंत जाण्यासाठी बोटिंगची परवानगी घेऊन नौकानयनची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. यासाठी वन्यजीव विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

सुविधांसाठी ‘सकाळ’ने वेधले लक्ष

हत्तीमहल जतन व पुनर्वसन योजनेचा आराखडा तयार झाला असून, सध्या निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात आहे. निधीची उपलब्धता होताच कामाला प्रारंभ होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात या परिसरात असलेल्या कर्मचारी वसाहतीपैकी वापराविना पडून असलेल्या २४ निवासस्थानांची व विश्रामगृहाची विशेष दुरुस्ती व सुधारणा प्रस्तावित आहे. या क्षेत्रात हत्ती सफारी सुरू होताच येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खात्रीलायक निवासी सुविधा उपलब्ध होईल. याकडे सातत्याने ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते.

"बेनझीर व्हिला वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्यास लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे."

- नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल, वन्यजीव विभाग, राधानगरी

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूच्या फलंदाजांचा आक्रमक अंदाज, चेन्नईसमोर ठेवलं 219 धावांचं लक्ष्य

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

SCROLL FOR NEXT