कोल्हापूर

कवठेगुलंदमधील लाभार्थ्यांची चौकशी होणार 

सकाळवृत्तसेवा

शिरोळ : कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील घरपडझडीच्या घोटाळयाची चौकशी करावयाची असेल तर संपूर्ण घरपडझडीच्या लाभार्थ्यांची चौकशी करावी या मागणीसाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी विरोध केला. त्यामुळे कवठेगुलंदच्या सर्व 403 लाभार्थ्यांची चौकशी करण्याचे आदेश तहसिलदार सौ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी काढले आहेत. 
यामुळे कवठेगुलंद येथील घरपडझडीच्या घोटाळयामधील लाभार्थ्यांची चौकशी होणार असल्याने आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसिल कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन स्थगित केले आहे. 

कवठेगुलंद येथील 403 नागरीकांनी पडझड घराचे अनुदान 95 हजार रुपयांप्रमाणे घेतले आहे. 403 लाभार्थ्यांपैकी काहिची आरसीसी व पक्‍की घरे असतानाही लाभ घेतल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली होती. यामध्ये 170 लाभार्थ्यांची यादी प्रशासनास दिली होती. या 170 लाभार्थ्यांच्या घरपडझडीबाबतची पुर्नचौकशी करण्यासाठी गेलेल्या चौकशी समितीला लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी विरोध करुन परतावुन लावले होते. चौकशी करावयाची असल्यास 403 लाभार्थ्यांची करावी अशी मागणी चौकशी समितीकडे केली होती. 

यामुळे कवठेगुलंदच्या घरपडझडीच्या घोटाळयाबाबतचे चौकशी समितीचे काम थांबले होते. आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी कवठेगुलंद येथील घरपडझडीच्या घोटाळयाची चौकशी झालीच पाहिजे यासाठी सोमवारी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. तहसिलदार सौ. अपर्णा मोरे धुमाळ सोमवारी कामानिमित्त बाहेर असल्याने मंगळवारी कवठेगुलंदच्या संपुर्ण 403 लाभार्थ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. याकरीता 12 जणांची स्वतंत्र समिती नेमली. 5 अभियंता, 1 मंडल अधिकारी, 6 तलाठी, याशिवाय पंचायत समितीकडील विस्तार अधिकारी 2 यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच समन्वय अधिकारी म्हणून व्ही. डी. शिंदे व प्रेम राठोड यांची नियुक्‍ती केली आहे. 15 दिवसाच्या आत या प्रकरणाची चौकशी व पडताळणी अहवाल द्यावा. यावेळी ग्रामस्थांचा विरोध झाल्यास पोलिस बंदोबस्तात चौकशी पूर्ण करावी, असे तहसिलदार मोरे-धुमाळ यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

कवठेगुलंद येथे घरपडझडीच्या अनुदानाचा लाभ घेताना अनेकांनी नियमबाहय अनुदान घेतले आहे. प्रशासन कोरोनाच्या संकटात काम करीत असल्याने कवठेगुलंदच्या कार्यकर्त्यांनी 170 जणांची यादी दिली होती. ग्रामस्थांच्या विरोधामुळे 170 जणांची चौकशी झाली नाही. आता 403 लाभार्थ्यांची चौकशी होणार असल्याने यामधुन सत्य निश्‍चितच बाहेर येईल. 
-धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश 

कोल्हापूर 

कोल्हापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

Japanese Hair Care: जपानी महिलांच्या सिल्की-शायनी केसांचे रहस्य काय? १ रुपयाही खर्च न करता ट्राय करा 'या' ६ सोप्या ट्रिक्स...

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT