Beneficiaries Of Mazi Kanya Bhagyashree Scheme Have Been Waiting For Three Years Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

'कन्यांचे भाग्य' प्रस्तावांपुढे सरकेना 

अवधूत पाटील

गडहिंग्लज : केंद्र शासनाच्या "बेटी बचाओ-बेटी पढाओ'च्या धर्तीवर राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना आणली. मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेली ही योजना पहिल्या टप्प्यात सुरळीत होती; पण सध्या या योजनेला ब्रेक लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. योजनेच्या लाभासाठी सादर केलेले प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामध्ये गडहिंग्लज तालुक्‍यातील 25 प्रस्तावांचा समावेश आहे. त्यामुळे आमच्या कन्यांचे भाग्य उजळणार तरी कधी, असा प्रश्‍न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. 

राज्य शासनाने 2016 मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना आणली. पहिल्या मुलीवर एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यास 50 हजार रुपये, तर दोन मुलींवर सहा महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यास दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी 25 हजार रुपये ठेव ठेवली जाते. तसेच मुलगी व मातेला एक लाख रुपयांच्या अपघात विम्याचे संरक्षणही आहे. 

सुरवातीला एक लाख रुपयांच्या आतील उत्पन्न असणाऱ्या पालकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता; मात्र वर्षभरानंतर सुधारणा करीत उत्पन्नाची मर्यादा साडेसात लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. पंचायत समितीकडील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे या योजनेसाठी प्रस्ताव सादर केले जातात.

योजनेसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर पहिल्या वर्षभरात तातडीने लाभ दिला जात होता. ऑगस्ट 2017 पर्यंत गडहिंग्लज तालुक्‍यात 14 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या सर्वांना योजनेचा तातडीने लाभ मिळाला आहे; मात्र गेल्या तीन वर्षांत तालुक्‍यातून 35 प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यांतील एकाही लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. योजनेच्या लाभासाठी विचारणा करणाऱ्या पालकांच्या पदरी निराशाच पडत आहे. 

आता कोरोनाची भर... 
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थाच विस्कळीत झाली आहे. साहजिकच शासनाच्या तिजोरीवरही परिणाम झाला आहे. जमा-खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी शासनाने आरोग्यासह महत्त्वाचे तीन विभाग वगळता अन्य विभागांचा निधी 33 टक्‍क्‍यांवर आणला आहे. यामध्ये महिला व बालकल्याण विभागाचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत माझी कन्या भाग्यश्री योजनेला निधी उपलब्ध होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. परिणामी, योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या पालकांना कोरोनामुळे आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Latest Marathi News Updates : नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर सुरु

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

SCROLL FOR NEXT