सैन्य भरतीसाठी मंत्रालयाला घेराओ घालू 
कोल्हापूर

सैन्य भरतीसाठी मंत्रालयाला घेराओ घालू

सदाभाऊ खोत; रयत क्रांती संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाचे कारण सांगून कोल्हापूरमध्ये होत असलेली सैन्य भरती जिल्हा प्रशासनाने रद्द केली आहे. सैन्य भरतीचा १५ दिवसांत योग्य तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला नाही तर मंत्रालयाला घेराओ घालू, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला, तर शिवाजी विद्यापीठ परिसरात सैन्य भरती करावी, यासाठी त्यांना पत्र पाठवले आहे. डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष भरती होण्यास अडचण येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. सैन्य भरतीच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेने हजारो तरुणांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. यावेळी ते बोलत होते.

खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांची पोरे आपण देशाचे संरक्षण करतो म्हणतात. त्याला शासनाकडून आडकाठी आणली जात आहे. कोरोनाचे कारण सांगून वारंवार सैन्य भरती थांबवली जात आहे. त्यामुळे मुलांचे वय वाया जात आहे. यासाठी आता वयोमर्यादा वाढवून पूर्वी भरलेल्या फॉर्मनुसारच भरती प्रक्रिया पार पडली पाहिजे.’ सागर खोत म्हणाले की, शासनाने भरतीबाबत विचार केला पाहिजे.

त्यावेळी कोरोना कुठे जातो?

मेळावे, उत्सव साजरे केले जातात. यामध्ये सर्व मंत्री हजेरी लावतात. त्यावेळी कोरोना वाढत नाही. सर्वसामान्य लोकांनी एखादा मोर्चा काढला की, लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो, अशीही टीका खोत यांनी केली.

आणखी किती दिवस बसायचे?

गोकुळ व इतर निवडणुका घेताना कोरोना होत नाही का? आम्ही अजून किती वाट पाहायची? देशसेवेसाठी आतूर असतानाही आमची भरती करून घेतली जात नाही. कोरोनाचे कारण सांगून वारंवार भरती टाळली जात आहे. आज होईल, उद्या होईल, या आशेवर आणखी किती दिवस बसायचे, असा सवाल सैन्य भरतीची प्रतीक्षा करणारे तरुण आकाश पाटील (रा. वडगाव) व विशाल घराळ (रा. भडगाव) यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना केला.

डिसेंबरमध्ये भरती : जिल्हाधिकारी

डिसेंबर महिन्यात सैन्य भरती करावी, यासाठी नियोजन सुरू आहे. शिवाजी विद्यापीठ परिसरात ही भरती होईल, यासाठी पत्र दिले आहे. तसेच भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना जेवण, राहण्याची सोय व सुविधा मिळाव्यात याचे नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आंदोलकांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT