कोल्हापूर

कोल्हापूरच्या डाॅक्टरांचा राज्यपालांकडून गौरव

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ह्रदय रोगन निदान व उपाचार पध्दतीत उल्लेखनीय काम केल्याबद्दल येथील स्वास्तिक हॉस्पिटलचे डॉ. अर्जुन आडनाईक (Arjun Adnaik)यांना पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कॉर्डीओलॉजिस्ट पुरस्कारने (Best Cardiologist Award) सन्मानित करण्यात आले.

राजनभवन येथे झालेल्या एका खास कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण डॉ. आडनाईक यांना करण्यात आले. आजपर्यंत डॉ. आडनाईक यांनी ह्रदय रोग निदान व उपचार पध्दतीत केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

डॉ. आडनाईक यांनी असंख्य रूग्णावर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. काही परदेशी नागरीकांवरही त्यांनी आपल्या रूग्णालयात उपचार केले आहेत. लहान मुलांच्या ह्रदयातील छिद्र चकतीद्वारे विन्छेद करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांतून अनेक रूग्णांवर उपचार केले आहेत. केवळ कोल्हापूरच नव्हे तर सोलापूर, सांगली, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदि जिल्ह्यातील रूग्णांवरही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

शस्त्रक्रियेशिवाय ह्रदयाची झडप बदलण्याचे तंत्रज्ञान कोल्हापुरात सर्वप्रथम डॉ. आडनाईक यांनी विकसित केले.

ह्रदयविकाराच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गेल्या दहा वर्षात या क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शस्त्रक्रियेशिवाय ह्रदयाची झडप बदलण्याचे तंत्रज्ञान कोल्हापुरात सर्वप्रथम डॉ. आडनाईक यांनी विकसित केले. या शस्त्रक्रियेला ‘ट्रान्सकॅथेटर’ महाधमनी बदलणे प्रक्रिया म्हणतात. त्यांनी केलेल्या या सर्व योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil: या 8 गावांवर विशाल-विश्वजित यांचे विशेष लक्ष, जयंत पाटलांच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चे नियोजन?

Sonakshi & Zaheer Wedding : शत्रुघ्न सिन्हा लावणार लेकीच्या लग्नाला हजेरी; भांडणाच्या चर्चांवर अखेर पडदा

Pankaja Munde: "सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी"; पंकजा मुंडेंचं हाकेंसाठी सरकारला साकडं

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

Anti-Theft Feature : मोबाईल चोरांचे वाईट दिवस सुरु! गुगल आणतंय 'हे' नवीन AI फिचर,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT