bhaiya mane return to his form from pune padvidhar matdar sangh in kolhapur 
कोल्हापूर

भय्या माने यांची पुणे पदवीधर मतदारसंघातून माघार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून माघार घेतल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी आता त्यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा केली. दरम्यान, कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेऊ, असे आश्‍वासन माने यांनी लाड यांना दिले. 

पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत; मात्र राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष भय्या माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. प्रत्यक्षात लाड यांचे नाव जाहीर झाल्याने माने यांनी माघार घ्यावी. यासाठी काल लाड यांनी त्यांची भेट घेतली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस मिळून लढवत आहेत.

अशावेळी सर्वांनी एकत्र येऊन मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला पाहिजे. त्यामुळे तुम्ही अर्ज माघारी घेऊन सहकार्य करावे, अशी विनंती लाड यांनी केली. भैय्या माने म्हणाले, ‘‘याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा करणे आवश्‍यक आहे. यासाठी उद्या सकाळी ११ वाजता मेळावा घेऊन मगच निर्णय जाहीर करू.’’ लाड यांनी शनिवारी  ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मुश्रीफ यांनी लाड यांना विजयाची खात्री दिली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT