Bhogavati Sugar Factory PN Patil Kolhapur esakal
कोल्हापूर

Bhogavati Sugar Factory : आमदार पी. एन. पाटलांनी सभासदांचा विश्वासघात केला, त्यांना त्यांची जागा दाखवा; कोणी केलंय आवाहन?

'सभासदांनी मोठ्या विश्वासाने दिलेल्या सत्तेला सुरुंग लावला.'

सकाळ डिजिटल टीम

गेल्या सहा वर्षांचा कारभार पाहता अक्षरशः लूट केली आहे.

राशिवडे बुद्रुक : ‘भोगावती कारखान्याच्या (Bhogavati Sugar Factory) संचालक मंडळाने कर्जमुक्तीऐवजी कारखान्यावर डोंगरच उभा केला आहे. याला सर्वस्वी कारखान्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील (P. N. Patil) हे जबाबदार असून त्यांनी सभासदांचा विश्वासघात केला. त्यांना त्यांची जागा दाखवा,’ असे आवाहन ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार- पाटील यांनी केले.

ते येळवडे (ता. राधानगरी) येथे सर्वपक्षीय भोगावती बचाव परिवर्तन आघाडीच्या संपर्क दौऱ्यात बोलत होते. पवार -पाटील म्हणाले, ‘पी. एन. पाटील यांच्या पॅनेलला विश्वासाने सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिले. जेव्हा त्यांच्याकडे सत्ता गेली तेंव्हा सत्तर कोटीचे कर्ज होते हेही त्यांनी मान्य केले. मोठा नेता असल्याने कारखाना कर्जमुक्त होईल आणि आमचं भलं होईल अशी भावना सभासदांची होती.

मात्र, गेल्या सहा वर्षांचा कारभार पाहता अक्षरशः लूट केली आहे. मिळेल त्या मार्गातून पैसा मिळवणे हे एकमेव काम करून कारखाना डबघाईला आणला आहे. ना कामगारांच्या पगारांचे प्रश्न सोडवले ना सभासदांच्या साखरेबाबत मार्ग काढला. ७० कोटीतले ७० रुपयेही कमी करता आले नाहीत. उलट ३७० कोटी रुपये लादले. आता त्यांना हद्दपार करण्याची जबाबदारी सभासदांची आहे, असंही त्यांनी सांगितलं.

माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले म्हणाले, ‘आजपर्यंतच्या कारभारातील सर्वात वाईट कारभार सध्याच्या संचालक मंडळाचा आहे. कमी दराने मोलॅसिस आणि साखर विकून वर्षासाठी ३० ते ३५ कोटी रुपये घशात घालण्याचे सोयीस्कर काम केले आहे. सभासदांनी मोठ्या विश्वासाने दिलेल्या सत्तेला सुरुंग लावला आहे.’

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील म्हणाले, ‘साखर चोरीचा हातखंडा या संचालक मंडळाचा ठरला आहे. सभासदांना चार पैसे देण्याऐवजी वाममार्गाने पैसा मिळवून हा कारखाना दुसऱ्याला चालवायला किंवा विकायचा घाट घातला आहे.’

यावेळी शिवसेनेचे अजित पाटील, निवास पाटील, बबन पाटील, भाजपचे सुभाष जाधव, माजी संचालक एकनाथ पाटील, अंबाजी पाटील, सज्जनराव पाटील, संजय मिसाळ, धनाजीराव पाटील'' संजय डकरे, शिवाजी राबाडे आदींसह सभासद उपस्थित होते. शहाजी पाटील यांनी आभार मानले. दरम्यान, सर्वपक्षीय भोगावती बचाव परिवर्तन आघाडीने कोदवडे, वाघवडे, मोहडे, पुंगाव परिसरातही संपर्क दौरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT