कोल्हापूर

यंदाच्या गळीत हंगामात भोगावती साखर कारखाना देणार 3003 रुपये

आमच्याकडे सत्ता आल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत असलेला हा कारखाना सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले

- राजू पाटील

आमच्याकडे सत्ता आल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत असलेला हा कारखाना सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले

राशिवडे बुद्रुक : भोगावती सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवणाऱ्या सभासदांना आणि शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी एफआरपी प्रमाणे तीन हजार तीन रुपये देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी केली. कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमाप्रसंगी ते आज बोलत होते. बॉयलर प्रदीपन कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे व भाग्यश्री डोंगळे या दाम्पत्यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार पाटील म्हणाले 'आमच्याकडे सत्ता आल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत असलेला हा कारखाना सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र साखर कारखानदारी समोरील अडचणींचा विचार करतात सातत्याने कर्जाचा बोजा वाढला आहे. त्याचे व्याज भागवणे हे आव्हान ठरत आहे. यातून ही प्रतिवर्षी एफआरपीप्रमाणे ऊस दर कारखान्याचे पगार व अन्य देणी वेळेत भागवली आहेत. यंदा जागतिक पातळीवर साखरेचे उत्पादन कमी झाल्याचा फायदा भारतीय साखर कारखानदारीला होणार आहे. ब्राझीलमध्ये साखरेचा दुष्काळ असल्याने साखरेचे दर वाढत आहेत. याचा निश्चित फायदा आपल्याला होईल. पुढील वर्षी निश्चित आपला कारखाना स्वबळावर दर देईल. एफआरपीप्रमाणे आम्ही ३००३ रुपये यंदाच्या गळीत हंगामासाठी एकरकमी देणार आहोत. शिवाय कामगारांच्या बोनसचा प्रश्न चर्चेनंतर निकालात काढू. सभासदांनी आपला सर्व ऊस कारखान्याला पुरवठा करावा असे आवाहनही त्यांनी केले.

स्वागत उपाध्यक्ष उदयसिंह पाटील- कौलवकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शिवाजीराव पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे' जिल्हा बँकेच्या संचालिका उद्यानी साळुंखे, पंचायत समिती सदस्य विजयसिंह भोसले, उत्‍तम पाटील, सुशील पाटील -कौलवकर, सरपंच आक्काताई कारंडे, भारती डोंगळे सर्व संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी आर. डी. पाटील यांनी केले. आभार संचालक बी. आर. पाटील यांनी मानले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: महिलांच्या हातामध्ये आता ‘पॅनिक बटण’, यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर; वापर कसा करायचा?

T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांखलीम येथे सामुदायिक शेती प्रकल्पाचे उद्घाटन केले

SCROLL FOR NEXT