कोल्हापूर

भुदरगडच्या सभापतीपदी सौ. आक्काताई नलवडे यांची बिनविरोध निवड

सकाळ वृत्तसेवा

गारगोटी (कोल्हापूर) : भुदरगड (Bhudargad)पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सौ. आक्काताई प्रविणसिंह नलवडे (Mrs Akkatai Nalwade)यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अश्विनी आडसूळ होत्या. गटविकास अधिकारी एस. जे. पवार प्रमुख उपस्थित होत्या.पंचायत समितीवर शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांची सत्ता आहे. तर विरोधी काॅग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाचा प्रत्येकी एक असे तीन सदस्य होते. यातील भाजपच्या सौ. आक्काताई प्रविण नलवडे आकुर्डे गणातून विजयी झाल्या होत्या. कालच सौ. नलवडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. (bhudargad-speaker-selection-akkatai-nalwade-kolhapur-political-news)

निवड सभेस उपसभापती सुनिल निंबाळकर, माजी सभापती किर्ती देसाई, स्नेहल परीट, सरिता वरंडेकर, अजित देसाई संग्रामसिंह देसाई, गायत्री भोपळे उपस्थित होत्या. निवडीनंतर सौ. नलवडे यांचा अधिकारी-पदाधिकारी यांनी सत्कार केला. तर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी आबिटकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, प्राचार्य अर्जुन आबिटकर, बाबा नांदेकर, कल्याण निकम, बी. एस. देसाई, धैर्यशील भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, दत्तात्रय उगले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, बी. डी. भोपळे, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे आदी उपस्थित होते. विद्याधर परीट यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT