Bibba  Sakal
कोल्हापूर

औषधी बिब्बा झाला दुर्मिळ...

काही धार्मिक विधीत तर बिब्ब्याच्या फळाशिवाय काम पूर्ण होत नाही

अमोल सावंत

कोल्हापूर - बिब्बा घातलास होय चांगल्या कामात, अशी म्हण आहे, बिब्बा हा सर्वांच्याच वापराचा, अमावस्या, पौर्णिमा आली की, मिरची, लिंबूबरोबर एक बिब्बा काळ्या दोरात ओवून गाडीला बांधतो; मात्र असा औषधी गुणधर्म असलेला बिब्बा दुर्मिळ होत आहे. कुठल्याही खासगी नर्सरीत, शासकीय रोपवाटिकेत मुद्दामहून बिब्ब्याची रोपे करत नाहीत.

निसर्गत: ती कुठेतरी उगवून तयार झालेले झाड असेल तर बिब्बा, बिब्ब्याची गोडांबी गोळा करायला अनेकजण जातात. लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केटमध्ये, किराणा माल, वनौषधी दुकानातील बरणीत हा बिब्बा हमखास दिसतो. विशेषत: काही धार्मिक विधीत तर बिब्ब्याच्या फळाशिवाय काम पूर्ण होत नाही, असे म्हटले जाते. संक्रांतीच्या काळात बिब्ब्याच्या वाळलेल्या गोडांबीच्या माळा पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी आदी भागांतून विक्रीसाठी येतात. ज्यांना ही गोडांबी खाल्ली आहे, ते लोक मात्र हमखास ते विकत घेतात. चवीला काहीशी तुरट अन्‌ गोड असते गोडांबी. वाळलेल्या अंजिराप्रमाणे चविष्ट असते. पूर्वी संक्रांतीला बुडुकलीत गाजर, हरबऱ्याचे घट्टे आदी पदार्थांबरोबर गोडांबीही असे; मात्र अलीकडे गोडांबीच्या माळा विक्रीसाठी कमी येऊ लागल्या आहेत.

औषधी गुणधर्म असलेल्या बिब्ब्याचे झाड मात्र शहर परिसरात, रत्याकडेला, महापालिकेच्या कुठल्याही उद्यानात दिसत नाही. कुठी मुद्दामहून कोणी हे झाड लावत नाही. अतिपावसाळी प्रदेशात ते कमी दिसते; मात्र ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी असते, तिथे बिब्ब्याचे झाड दिसते; पण ही झाडे कमी झालेली दिसतात, अशी नोंद वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी नोंदविली आहे. गिरगाव, कात्यायनी, कागल, पन्हाळा, शाहूवाडी, निपाणी, गडहिंग्लज, एकोंडी भागांत ही झाडे दिसतात; मात्र पूर्वीसारखी जास्त नाहीत. बेळगावमध्ये बिब्ब्यांची बाजारपेठ असून, अनेक विक्रेते बिब्बे इथे घेऊन येतात. यानंतर बिब्बा फळ, गोडांबीची विक्री करतात. गोडांबीला ६००/७०० रुपये भाव मिळतो. परिसरात, महापालिकेनेही बागांत हा वृक्ष लावला तर गोडांबीबरोबर बिब्बा बी मिळेल. रोजगार मिळवून देणारे हे झाड आहे.

बिब्बा उपयुक्त फळ

कर्करोगात फळांचा रस फायदेशीर

फळांचा वापर अस्थमा, कफ, मेंदूविकार, फीट

सांधेदुखी, घशाचे विकार, कुष्ठरोग, मूळव्याध विकारात उपयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Odisha Assam Floods: ओडिशा-आसाममध्ये पावसाचा हाहाकार; ७८ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांचा जीव धोक्यात

CWG26 India Medal Tally : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने आतापर्यंत किती पदकं जिंकली? ऑस्ट्रेलिया शतकासह अव्वल, तर...

Latest Marathi News Live Update : राधानगरी धरण १०० टक्के भरले; स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता

Pune-Bengaluru Highway : सहा पदरीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह! मुरगूड रोडनंतर आता गांधी हॉस्पिटलजवळ राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT