Bicycle prices rise by 10 per cent in a week 
कोल्हापूर

सायकलच्या बाजारपेठेत तेजी; देशी बनावटीच्या सायकलसह विदेशी सायकलला अधिक मागणी

सुयोग घाटगे

कोल्हापूर : मागणी अधिक आणि पुरवठा कमी या सिद्धांतानुसार शहरातील सायकलच्या किमती वधारल्या आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सायकलच्या सुट्याभागाच्या उत्पादनावर आणि किमतीवर झालेल्या परिणामामुळे या किंमती वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या कालावधीत लॉकडाउनने हैराण झालेल्या अनेकांनी अनलॉकमध्ये स्वतःचा फिटनेस राखण्यासाठी सायकलचा आधार घेतला. यामुळे सायकलच्या बाजारपेठेत तेजी आली. ज्या ठिकाणी महिन्याकाठी ५० ते ६० सायकल विकल्या जात होत्या, त्या ठिकाणी २०० ते २५० सायकल विक्री होऊ लागल्या. यामुळे देशी बनावटीच्या सायकलसह विदेशी सायकल विकल्या गेल्या.

चार महिने चालेल्या या तेजीमुळे उत्पादक कंपन्यांवर दबाव आला तर सुट्टेभाग उत्पादन करणारे, निर्यात करणारे यांच्याकडील मालाचा तुटवडा निर्माण झाला. शिवाय शहरातील सायकलच्या मागणीत अजूनही वाढच होत असल्यामुळे या किमती दिवसागणिक वाढतच आहेत. महिनाभरात या किमती १० टक्‍क्‍यांवरून वाढत जाऊन २५ टक्केपर्यंत वाढल्या आहेत. 

दोन ते तीन आठवड्यांचे वेटिंग आणि ॲडव्हान्स बुकिंगने सध्या सायकल विक्री सुरू आहे. उत्पादकांना अधिक किंमतीने सुट्टे भाग खरेदी करावे लागत असल्यामुळे त्यांच्याकडूनच किंमती वाढल्या आहेत.
- गिरीश परमाळे, सायकल विक्रेते

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांची कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; एआय तंत्रज्ञानातून गुणवत्तेवर लक्ष

Beed Teacher Scam: बीडच्या शिक्षक भरती घोटाळ्यात मोठा दणका! ७३ बोगस शिक्षकांची सेवा समाप्त; अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार

Pune Nashik Highway : भोसरी, चाकण आणि राजगुरूनगरमधील वाहतूक कोंडी सुटण्याची आशा; पुणे-नाशिक महामार्गाच्या उन्नत मार्गाचे काम कार्यादेशानंतर तीन वर्षांत पूर्ण होणार

Marathi News Live Updates : ऊसतोड मजूर महिलांची वेदनादायी अवस्था! चार दिवसांची सुट्टी परवडत नाही म्हणून गर्भाशय काढण्याची वेळ?

Malkapur News: मित्राची दुचाकी घेऊन बाहेर पडला, परतलाच नाही; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT