Dhananjay Mahadik esakal
कोल्हापूर

Kolhapur : काँग्रेस-राष्ट्रवादीतील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; महाडिकांनी टाकला बॉम्ब, राजकीय वर्तुळात चर्चा

पक्षाने लोकसभा लढवा, असे सांगितले तर तीही तयारी आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : ‘मी भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. पक्षाने सांगितले लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवा तर लढवणार. पक्षाने सांगितले खासदार मंडलिकांचा प्रचार करा, तर त्यांचाही प्रचार करणार. लोकसभा निवडणुकीत पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार,’ असे स्पष्टीकरण खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.

लोकसभा निवडणुकीबद्दल विचारले असता खासदार महाडिक (Dhananjaya Mahadik) म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार काम करणार. पक्षाने लोकसभा लढवा, असे सांगितले तर तीही तयारी आहे. जर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करा, असे सांगितले तर त्यांना निवडून आणण्यासाठी काम करणार.

मी भाजपचा खासदार असल्याने पक्ष सांगेल त्याप्रमाणे काम करणार आहे. महापालिका निवडणुकीबद्दल ते म्हणाले, ‘राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आम्ही विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी-सुविधांसाठी १० कोटींचा निधी दिला आहे. नगरोत्थान महाभियानअंतर्गत ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

शहरातील विविध प्रभागांत हा निधी देण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांत शहरामध्ये किती विकासकामे पूर्ण झाली, याचा हिशेब त्यांनी दिला पाहिजे. महापालिका निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होईल, असा अंदाज आहे. या निवडणुकीत महापालिकेत सत्तांतर होणार असून, शिवसेना-भाजपची सत्ता येईल.’

काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नेते पक्षात येणार

‘जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मोठे नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. २७ जूनला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा होणार आहे. या दौऱ्यात हे प्रवेश होतील,’ असेही महाडिक म्हणाले. तसेच ज्यांना भाजपमध्ये काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी पक्षाच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT