kmc news 
कोल्हापूर

कोल्हापुरातील पूरबाधीतांसाठी मोठी बातमी ः घरफाळा, पाणीपटटीत मिळणार 50 ते 100 टक्‍यांपर्यंत सवलत, मिळकतधारकांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द

प्रतिनिधी

कोल्हापूर ता.05 : शहरात ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरात बाधित झालेल्या मिळकत धारकांना आणि पाणी कनेक्‍शन धारकांच्या घरफाळा आणि पाणी पट्टीमध्ये ज्यां मिळकतींची पूर्ण पडझड झालेली आहे त्यांना शंभर टक्के सवलत तर ज्यां मिळकतीं पाण्यामध्ये अंशत: अथवा संपूर्ण बुडाल्या होत्या त्यांना पन्नास टक्के सवलत देण्यात आलीय. या सवलत योजनेत एकूण तीन हजार सातशे घरफाळा सवलत आणि तीन हजार बत्तीस पाणीपट्टी सवलत मिळकत धारकांचा समावेश आहे. याबाबतची माहिती आज महापालिकेने प्रसिध्द केली आहे. 
ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापूरामध्ये पुरबधित क्षेत्रातील मिळकत धारकांना सवलत देण्याचा महासभा ठराव क्रं. 47 , 20 ऑगस्ट 2019 ला करण्यात आला होता. त्यानुसार समक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करून महापालिकेच्या तीन हजार सातशे मालमत्ता धारकांना तर तीन हजार बत्तीस नळ कनेक्‍शन धारकांना शंभर टक्के आणि पन्नास टक्के सवलत योजनेच्या यादीत समावेश करण्यात आला. या पात्र लाभार्थ्यांची यादी पालकमंत्री सतेज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या संकेतस्थळावर आज ऑनलाईन जाहीर करण्यात आली. 
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी या यादी व्यक्तिरिक्त अन्य काही लाभार्थी असतील तर त्यांनी महापालिकेशी संपर्क साधाण्याचे आवाहन करण्याच्या सुचना केल्या. तसेच प्रसिध्द केलेल्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे मेसेज द्यावा अशा सूचना केल्या. 
आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पूरबाधीत क्षेत्रातील गरीब नागरीकांना याचा फायदा व्हावा म्हणून हा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील नागरीक महापालिकेस कायम सहकार्य करतात, असे सांगितले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, महिला आणि बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे,परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, उपायुक्त निखिल मोरे,करनिर्धारक संग्राहक संजय भोसले,मुख्य लेखापाल संजय सरनाईक आदी उपस्थित होते. 
...... 
शहरातील एकूण मिळकती : 1 लाख 44 हजार 
पूरबाधित मिळकत लाभाथीं 
घरफाळा सवलत लाभार्थी : 3700 
पाणीपट्टी सवलत लाभार्थी : 3032 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT