Big news for pensioners: those who are sold will get extra pension amount 
कोल्हापूर

पेन्शनरांसाठी मोठी बातमी ः विकलेल्यांना पेन्शनची मिळणार जादा रक्कम

प्रतिनिधी

कोल्हापूर ः विक्री केलेली पेन्शनची रक्कम पंधरा वर्षांनंतर व प्रदीर्घ लढ्यानंतर ईपीएस पेन्शनरांना मिळाली आहे. पेन्शनदारांच्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे, अशी माहिती सर्व श्रमिक संघाच्यावतीने दिली आहे. 
ईपीएस पेन्शन योजनेमध्ये कामगारांना निवृत्ती वेळी पेन्शन विक्रीची (कम्युटेशन) सोय होती. पेन्शन विक्री केलेल्या रकमेची भरपाई करावी, अशी भूमिका सर्वप्रथम पेन्शनर संघटनांच्या अखिल भारतीय राष्ट्रीय समन्वयाच्या दिल्ली येथील पहिल्या अधिवेशनात 2012 मध्ये मांडली. यानंतर देशभरात समन्वय व त्याच्या घटक संघटनांनी या मागणीचा सतत पाठपुरावा केला. तीन वर्षांपूर्वी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्‍वस्त मंडळात (सीबीटी) या विषयावर चर्चा होऊन निर्णय झाला; परंतु केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेणे टाळले होते. समन्वय समिती व घटक संघटनांनी तीन वर्षे पाठपुरावा केल्यामुळे सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले आहे, अशी प्रतिक्रिया समन्वय समितीचे सहनिमंत्रक अतुल दिघे यांनी व्यक्त केली आहे. 
दरम्यान, 2008 पूर्वी निवृत्त झालेल्या व पेन्शन विक्री केलेल्या पेन्शनरांना याचा फायदा मिळणार आहे. ज्याने पेन्शन पंधरा वर्षे घेतली आहे. त्याला विक्री केलेली रक्कम सोळाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात वाढवून मिळणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT