Sharad Pawar Shahu Chhatrapati Maharaj esakal
कोल्हापूर

उमेदवारी मिळाली तर आनंदच, पण अजून ऑफर नाही; लोकसभा निवडणुकीबाबत शाहू छत्रपती महाराजांचं सूचक विधान

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

या संदर्भात दोन दिवसांपूर्वी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील शाहू महाराजांची भेट घेतली होती.

कोल्हापूर : ‘लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा होत आहे. मात्र अद्याप तसा निरोप आलेला नाही. उमेदवारी मिळाली तर आपण सर्वजण मिळून ही मोहीम यशस्वी करू,’ असे सूचक वक्तव्य श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी केले.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) कोल्हापूर मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी देण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.

या संदर्भात दोन दिवसांपूर्वी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील शाहू महाराजांची भेट घेतली होती. यातून त्यांना लोकांची पसंती आहे, ही जागा विनासायास विजयी होईल, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांना कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सूचक वक्तव्य केले असून लोकसभेची उमेदवारी मला मिळाली तर अनेकांना आनंदच होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेल्वेला उशीर, AC किंवा कोचमध्ये बिघाड असल्यास चिंता करू नका! तिकीटाचा एक-एक पैसा मिळणार परत, IRCTC कडून रिफंड घेण्यासाठी करा हे एकच काम

March Astrology 2026: 30 वर्षांनी मोठा ग्रहयोग! मार्चमध्ये शनि–सूर्य एकत्र, ‘या’ 3 राशींना होणार जबरदस्त आर्थिक फायदा

Solapur News: ‘शक्तिपीठ’चे आमदारांकडून कौतुक; नव्या आराखड्यात माढा तालुक्याचा समावेश, बागायती जमिनीच्या नुकसानीची भीती!

Manali Traffic Jam : मोठ्या विकेंडला पर्यटकांचे हाल ! 'या' प्रसिद्ध ठिकाणी वाहनांच्या प्रचंड रांगा, ३०० मीटर अंतर पार करायला लागले ५ तास

Jalna News : जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार; पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे अजब वक्तव्य

SCROLL FOR NEXT