Billions turnover jam of beans's In Chandgad Kolhapur Marathi News
Billions turnover jam of beans's In Chandgad Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

बिनिसची कोट्यावधीची उलाढाल ठप्प

सुनील कोंडुसकर

चंदगड : कळसगादे (ता. चंदगड) परिसरात बिनिस पिकाची कोट्यावधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. कोरोनामुळे वाहतुकीवर आलेली मर्यादा आणि बाजारपेठेत दर कोसळल्यामुळे उत्पादकांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. गतवर्षी एक किलोचा दर 80 रुपये होता तो या वर्षी केवळ 15 रुपयांवर आला आहे. वाहतुक, हमाली व दलाली वजा जाता हातात शिल्लक काय राहणार या विचाराने शेतकऱ्यांनी पिक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

कळसगादे, पार्ले, जेलुगडे, पाटणे, शेवाळे आदी गावातून बिनिसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दररोज सुमारे दहा टेंपो बिनिस बेळगाव बाजारपेठेत पाठवले जातात. एका टेंपोमध्ये सुमारे दोनशे पोती माल भरला जातो. एका पोत्यात सुमारे 80 किलो माल असतो. यातून प्रत्येक गावात मार्च ते मे अखेर या तीन महिन्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. या वर्षीही अशाच पध्दतीने उत्पादन घेतले असून वेलांना बिनीसच्या शेंगा लगडलेल्या आहेत. परंतु कोरोनामुळे माल वाहतुकीला मर्यादा आहेत.

वाहने उपलबध होत नाहीत. इच्छा असूनही जादा माल पाठवता येत नाही. दुसरीकडे बाजारपेठेत दर कोसळले आहेत. गतवर्षी 80 रुपयांचा दर या वर्षी अवघ्या 15 रुपयांवर आला आहे. वाहतुक खर्च, हमाली व दलाली विचारात घेता शेंगा तोडणीची मजुरीसुध्दा निघत नाही अशी स्थिती आहे. शिवाय लागवड खर्च, बियाणे, मशागत याचा विचार करता या वर्षी हे उत्पादन अंगलट असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

दर कोसळले
गेल्या काही वर्षात बिनिसच्या उत्पादनाने या परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावला होता. हक्काची बाजारपेठ असल्याने पिकाचे क्षेत्रही वाढत आहे. परंतु या वर्षी कोरोनाने वाहतुक थांबली. बाजारपेठेत दर कोसळले. मजुरीसुध्दा निघत नाही अशी स्थिती आहे. 
- विठ्ठल दळवी, बिनिस उत्पादक शेतकरी, कळसगादे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT