Biodiversity in Crisis began to appear in the forest kolhapur marathi news 
कोल्हापूर

जैवविविधता संकटात! वणव्याच्या भडक्यात डोंगर दिसू लागले काळेकुट्ट 

अर्चना बनगे

कोल्हापूर : सह्याद्रीच्या पर्वतचा वरदान लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक डोंगरावर वनवा लागण्यास सुरुवात झाली आहे. कधी जाणीवपूर्वक आग लावली जाते तर कधी अपघातांनी वणवा पेटतो. मात्र हिरव्यागार शालूने पावसाळ्यात बहरलेल्या आणि सध्या पांढर्‍या गवताच्या आच्छादनाने वेगळ रूप दिसणार्‍या या डोंगराची अवस्था सध्या मात्र अत्यंत भीषण वाटत आहे.

 उन्हाचा पारा जसा वाढतो आहे तसं जंगली आगीचा देखील वेग वाढू लागला.  उन्हाळा सुरू झाला की जंगलाला, डोंगरांना आग लागण्यास सुरुवात होते. रस्त्याच्या कडेला असणारा हिरवागार डोंगर आता काळा राखेने माखु लागला आहे. नजर पोचेल तिथपर्यंत केवळ काळाकुट्ट डोंगरच दिसू लागला आहे. यामध्ये अनेक छोटे छोटे कीटकनाशक, सरपटणारे प्राणी, यांचा नाहक जीव जात आहे.

 पूर्वी काही भागांमध्ये जमीन जाणीवपूर्वक जाळली जात होती. जमीन जाळ्याने चांगल्या प्रमाणात त्याठिकाणी गवत उगवते आणि हा चारा उपयोगी पडतो  अशा समजुतीतून आग लावली जातात. मात्र एकदा लागलेली आग वाऱ्यासारखी भरभर पसरते आणि ती कुठे थांबेल याचा अंत नाही लागत मात्र या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

डोंगरावर असणारा  चारा भस्मसात होतोच मात्र फळांनी भरलेले झाड सुद्धा याची शिकार होते. याशिवाय अनेक वाढलेली झाडे हे या आगीच्या भक्ष्यस्थानी काहीवेळा जळून खाक होतात. नव्याने आलेल्या रोपट्याचे अस्तित्व त्यांचे जीवन सुरू होण्यापूर्वीच नष्ट होऊन जातात. यामुळे तापमानात प्रचंड उष्णता निर्माण होते आणि उन्हाचे चटके अधिकच जाणवू  लागतात.

झाडावर बसणारे लहान लहान पक्षी यामध्ये धुराने घुसमटून मरतात. नवीन जन्माला येणार जीव नष्ट होतात. झाडे जळून खाक होतात आणि या धुरामुळे कार्बन डाय-ऑक्साइड हवेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला जातो याचा नक्कीच परिणाम मानवी जीवनात तर होतोच शिवाय प्राण्यांवर होतो.यामध्ये पक्षी मात्र प्रचंड हतबल होतात. ज्या भागामध्ये वनवा पेटला आहे त्याठिकाणी  असलेल्या झाडावरील पक्षी नव्या शोधात चिवचिवाट करत फिरू लागतात. लगत असलेल्या एखाद्या तारांचा आसराच त्यांना तारू शकते.

का लागते आग?
चैत्र वैशाख सुरू झाला की वारे जोरदार सुटू लागते आणि या वाऱ्यामुळे झाडांचे एकमेकांशी घर्षण होते यातूनही आग लागू शकते. किंवा झाडावर पडणाऱ्या विजेनेही मोठ्या प्रमाणात आग लागू शकते. दुसरे कारण असे आहे मानव निर्मिती आग लागू शकते. यामध्ये हौशे नवशे गवशे यांचाही समावेश आहे. काळोख्या रात्री एन्जॉयमेंट साठी जंगलामध्ये शेकोटी करायची किंवा सिगारेट ओढताना काडी तिथेच फेकून द्यायच. यामुळे  बघता बघता आग रुद्र रूप  धारण करते. 

जंगलांना वाचवायला हवे
जंगलाला वाचवायचे असेल तर एक नियोजनबद्ध विकासाची गरज आहे .क्षणिक फायद्याचा विचार न करता त्या परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळ या डोंगरावर जीवसृष्टीवर वाचल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, याची त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. 
प्रमोद माळी, निसर्ग अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audi footpath crash: दिल्लीत भयानक अपघात! ऑडी चालकाने फूटपाथवर झोपलेल्या ५ जणांना चिरडले

Sugarcane FRP : सरकारच्या एका निर्णयामुळे साखर कारखाने येणार अडचणीत, इनकम टॅक्स विभागाची राहणार करडी नजर; शेतकऱ्यांनाही फटका

'ते' सिद्ध करा, मी राजकारणातून संन्यास घेतो, अन्यथा सतेज पाटलांनी संन्यास घ्यावा; आमदार क्षीरसागरांचं ओपन चॅलेंज

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Nitin Gadkari: शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या! शिक्षकांच्या ॲप्रूव्हल अन् अपॉइंटमेंटसाठीही पैसे लागतात, नितीन गडकरींचा परखड टोला!

SCROLL FOR NEXT