Birth and death certificates government hospitals kolhapur sakal
कोल्हापूर

सरकारी रुग्णालयातही जन्म आणि मृत्यूचे दाखले

जन्म-मृत्यू दाखल्‍यांसाठी अंमलबजावणी; महापालिका, नगरपालिकांवरील ताण होणार कमी

डॅनियल काळे

कोल्हापूर : सरकारी रुग्णालयात जन्म आणि मृत्यूचे दाखलेही आता मिळणार आहेत. १ डिसेंबर २०२१ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिका आणि नगरपालिकांवरील दाखले देण्याचा ताण यामुळे कमी होणार आहे. सरकारी रुग्णालयात जन्म आणि मृत्यू झाला असल्यास असे दाखले आता सरकारी रुग्णालयात मिळणार आहे. यापूर्वी हे दाखले मिळविण्यासाठी नगरपालिका आणि महापालिकेत हेलपाटे मारायला लागत होते.

आता मात्र सरकारी रुग्णालयातच हे दाखले मिळणार आहे. केंद्र आणि राज्यसरकारने त्यासंदर्भात निबंधकाचे अधिकार रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.जन्म आणि मृत्यूच्या नोंदी आणि दाखले हा महत्त्वाचा सरकारी अभिलेख आहे. त्यामुळे या नोंदी करणे आणि त्याप्रमाणे दाखले देणे ही प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत आणि महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे. यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थामधून त्यासाठी स्वतंत्र विभाग केला आहे. नगरपालिका, ग्रामपंचायत आणि महापालिका हद्दीत असणाऱ्या प्रत्येक खासगी आणि सरकारी रुग्णालयातील जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करून त्याप्रमाणे संबंधितांना दाखले देणे ही या संस्थेची जबाबदारी आहे. याचा फार मोठा ताण संबंधित यंत्रणेवर येत होता. त्यामुळे शासनाने यामध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे.

या नव्या बदलानुसार सरकारी रुग्णालयात जन्म आणि मृत्यूचे दाखलेही मिळणार आहेत. तशी व्यवस्था त्या-त्या सरकारी रुग्णालयांनी करायची आहे. १ डिसेंबर २०२१ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरात कोणत्याही खासगी अथवा सरकारी रुग्णालयात जन्म अथवा मृत्यू झाल्यास यापूर्वी महापालिकेवरच नोंदी करणे आणि दाखले देण्याची जबाबदारी होती. आता मात्र या यंत्रणेत सरकारी रुग्णालयचाही समावेश केला आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिकांवरील ताण आता कमी होणार आहे.

विभाग अडगळीतच

कोल्हापूर महापालिकेच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागाच्या अनंत अडचणी आहेत. या विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. इंटरनेट सेवेत वारंवार खंड पडतो. जुनेच संगणक आहेत. त्यामुळेही अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढत काम सुरू आहे. जागेचीही मोठी अडचण आहे. अपुरी जागा आहे. त्यातच कागदपत्रे ठेवणे, रेकॉर्ड सांभाळणे अशी कामे करावी लागत आहेत.

अपेक्षित गती नाही

सरकारी रुग्णालयात जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळणार असले तरी या कामात अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे काहीवेळा नातेवाईकांना त्रास होत आहे. त्यामुळे या कामात सरकारी रुग्णालयानी अपेक्षित गती प्राप्त करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

महापालिकेच्या २०२०-२०२१ वर्षातील चित्र

जन्म

नोंदी - १७ हजार ७२४

वितरित केलेले दाखले - ३७ हजार ६०२

मृत्यू

नोंदी - ११ हजार १६२

वितरित दाखले - २५ हजार ७०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT