bison are left from kolhapur city today morning said forest officer in kolhapur 
कोल्हापूर

हुश्श! गवे गेले अखेर शहराबाहेर

शिवाजी यादव

कोल्हापूर : गेली तीन दिवस कोल्हापूरातील लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा परिसरात ठाण मांडून असलेले तीन गवे आज पहाटे तीनच्या सुमारास बालिंगा परिसराकडे गेले आहेत. तिथून ते खुपिरे परिसराकडे गेले. ऊस शेतीचा आधार घेत हे गवे जंगली भागाकडे जातील असा अंदाज वनविभागाने वर्तवलेला असून वन विभागाची दोन पथके अद्यापही या गव्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. अशी माहिती करवीरचे वनपाल विजय पाटील यांनी दैनिक 'सकाळ'शी आज बोलताना दिली.

गेले तीन दिवसापूर्वी लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा या भागात तीन गवे आले. या गव्यांनी अवतीभोवतीच्या ऊस शेती व गवत कुरणांमध्ये फेरफटका मारला. अनेकदा गव्यांनी शिंगणापूर, हनुमंतवाडी, लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा परिसर शेती या भागात फेरफटका मारला. याच वेळी तरुणांचे अनेक गट परिसरातील रस्त्यावरून दुचाकी वाहनांद्वारे फेऱ्या मारत असताना गोंगाट झाला. त्यामुळे गवे बिथरले व त्यांना परतीचा मार्ग मिळणेही कठीण झाले. अशात रविवारी दुपारनंतर ऊस शेतीमध्ये गवे गेले होते. त्यामुळे या गव्यांचा माग काढणे वनविभागाला ही मुश्किल बनले होते. मात्र वनविभागाची दोन्ही पथके त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. 

रविवारी दुपारी ऊस शेतीमध्ये गडप झालेले गवे मध्यरात्री अचानक चंबुखडी जवळील एका शाळेच्या फटका पर्यंत गेल्याचे वनविभागाला दिसून आले. गव्यांना रस्ता ओलांडून पुढे जाता येणे मुश्कील झाले तेव्हा यातील एका गव्याने शेजारी असलेले लोखंडी फाटक तोडून टाकले व त्यातून तीनही गवे चंबुखडीचा रस्ता ओलांडून बालिंग्याच्या दिशेने गेले. त्यानंतर वनविभागाचे पथक ही त्यांच्या पाठोपाठ पुढे गेले, मात्र पहाटे तीनच्या सुमारास गवे पुन्हा शेतीमध्ये गडप झाले. बालिंगा परिसरातून हे गवे खुपीरेच्या बाजूने जातील असा अंदाज वर्तवला जात आहे. शहराच्या बऱ्यापैकी पलिकडच्या भागात गेलेले गवे पुन्हा शहरात येऊ नयेत यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT