BJP activists and students of MPSC on collector office against the MPSC exam decision in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एम.पी.एस.सी मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पुर्व परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने आणि वाढीव वीज बिल देत नागरिकांचे कनेक्शन पुन्हा तोडण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ कोल्हापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको करण्यात आला. भाजपाकडून यावेळी महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, सरकारमध्ये एकवाच्याता नाही. मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. परीक्षा लांबणीवर टाकायची होती तर अधिवेशनात निर्णय का घेतला नाही. सरकार विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटण्याचं काम सरकार करत आहे. मुख्यमंत्री घरातूनच कारभार हाकत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयशून्य कारभारामुळे जनतेचे हाल होत आहेत, अशी टीका यावेळी ठाकरे सरकारवर करण्यात आली.

जिल्हा भाजपा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, हॉटेल, मद्यालये सर्व सुरु असताना परीक्षेच्या वेळीच कोरोना कसा काय वाढतो? या लबाड सरकारचे डोक ठिकाणावर नाही. यावेळी भाजपा महिला आघाडी, युवा मोर्चाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhavwadi Theft case : धक्कादायक! वैभववाडीत बंद बंगला फोडला, चक्क चोरट्यांनी दोन गॅस सिलिंडर चोरले

MI vs KKR सामन्यावर पावसाचं सावट? काय आहेत हवामान अंदाज अन् कसा राहिलाय दोन्ही संघाचा रेकॉर्ड?

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Horoscope : उद्या ३० मार्च! नवा आठवडा 'या' ३ राशीच्या लोकांसाठी धनलाभ योग आणणार; अडकलेले मोठे काम मार्गी लागणार, विदेश दौरा संभवतो

Pune News: भोर येथे उभारणार शंभूराजेंचा पुतळा; सर्वसाधारण सभेत ठराव, नवीन व्यापारी संकुलाची जागा निश्चित!

SCROLL FOR NEXT