कोल्हापूर

'ती' टीका मुश्रीफ यांना झोंबली

टीका करणे राम भक्ताला शोभत नाही

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : गामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करणे, त्यांच्यासारख्या राम भक्ताला शोभत नाही, श्री. पाटील हे पन्नास वर्षांहून अधिक समाज कार्यात आहेत. वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून एक तपाहून अधिक काळ त्यांनी समाजासाठी देशभरात काम केल्यामुळे त्यांचा अभ्यास मोठा आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते बोलतात, विरोधी नेत्यांच्या चुकीच्या धोरणावर बोलणे हा राजकीय प्रघात आहे आणि त्यांनी तशी टीका केली. ती टीका झोंबलेली दिसते, असे पत्रक भाजपाचे महेश जाधव, राहूल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मित्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

एका तालुक्याचा मतदारसंघ सोडून तुम्ही शहरातून निवडणूक लढवू शकत असता तर तुमची दादांवरील टीका योग्य असू शकली असती. परंतु तुम्ही तसे करू शकत नाही. एकाच मतदारसंघात राहिल्यामुळे जिल्ह्याबाहेर तुमची ओळख कमी आहे. पक्षातही एक अनुयायी इतकीच तुमची ओळख. पद मिळवतानाही आपल्या गुरूचा विश्वासघात करून मिळविले हे जनता जाणते. "अहमदनगरचे पालकमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा" असे बोर्ड तुम्ही पालकमंत्री असलेल्या अहमदनगरमध्ये लागल्याचे जनतेने पाहिले आहे.

कोरोना परिस्थितीत तुम्ही पालकमंत्री असलेल्या अहमदनगरला जायचे सोडून कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांच्या कामात तुम्हाला ढवळाढवळ करतानाही जनतेने पाहिले आहे. "कोरोनाच्या पहिल्या लाटेत शेतकऱ्यांचे डोळे पांढरे होतील, असे पॅकेज महाविकास आघाडी सरकार देईल" अशी घोषणा आपण केली होती. नुकत्याच राज्य शासनाने जाहीर केलेल्या फसव्या पॅकेजमुळे आपले डोळे पांढरे झाले असावेत आणि म्हणूनच इतरांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे तुम्हाला भासत असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT