Devendra fadanvis  sakal
कोल्हापूर

फडणवीसांचा कोल्हापुरातून राज्यसरकार अन् काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, कोल्हापूरमधील एका चौकात हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगव्या वस्त्रातील फोटो असायचा आणि त्या फोटोकडून उर्जा मिळायची. मात्र, आज त्याच फोटोवर सोनिया गांधी आणि त्यांचा हात दिसल्याचे म्हणत हे बघून वेदना झाल्या. महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला आलीय असे म्हणत, येत्या 12 तारखेला विजयाची गदा नानांच्या हाती द्यायची आहे असे त्यांनी उपस्थिताना केले. ते कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेदरम्यान कोल्हापूरात बोलत होते. (Devendra Fadanvis Attack On Maharashtra Government )

फडणवीस म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांना वंदन करतो, कोल्हापुरात येताच बाळासाहेब ठाकरे यांचे एक पोस्टर पाहायला मिळायचं आणि एक ऊर्जा मिळत असे. मात्र, आज आलो त्यावेळी पोस्टर पाहायला मिळालं, पण बाळासाहेब यांच्या फोटोसोबत सोनिया गांधी यांचा फोटो होता. ते पाहून वेदना झाल्या. कोल्हापूर उत्तर हे भगव्याचे असून, ते भगव्याकडे आलेच पाहिजे, असे म्हणत आज झुकलात तर, पुन्हा भगव्याचे दर्शन होणार नाही असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

माऊलीशी आमची दुश्मनी नाही, पण त्यांच्यामागे असणाऱ्या पालकमंत्र्याला विरोध आहे. आज माऊलीला निवडून दिले, तर 2024 साली पालकमंत्री उमेदवार असतील असे ते म्हणाले. पालकमंत्र्यांनी आतापर्यंत काय दिवे लावले असे म्हणत फडणवीस म्हणाले की, तुम्ही लावलेला टोल काढण्यासाठी मला आणि चंद्रकांतदादा पाटील यांना यावं लागलं. विमानतळासाठी भर रस्त्यात चंद्रकांतदादा पाटील यांनी माझी सही घेतल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही आम्हाला नाना द्या आम्ही तुम्हाला पंचगंगा देतो असे ते म्हणाले. विरोधी पक्षाने तुमची काय अवस्था केलीय हे विधिमंडळात पाहताय ना? असा प्रश्न उपस्थित करत 2019 साली महापुरात आम्ही जी मदत दिली तशी मदत तुम्ही महापुरात का दिली नाही असे ते म्हणाले.

कोरोनात तुम्हाला गोकुळची निवडणूक महत्वाची होती, त्याकाळात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना बंटी पाटील उत्तर द्यावं लागेल. हे सगळे 100 कोटीच्या वसुलीच्या मागे लागले आहेत, हे काय आम्हाला सुरक्षा देणार असे फडणवीस म्हणाले. या देशात लोकशाही आहे तुमची दहशत चालणार नाही. महाराष्ट्रात सरकार नाही तर भ्रष्टाचार आहे. कोरोना काळात इंग्लिश दारुवरचा टॅक्स कमी केला बेवड्यांचे हे सरकार आहे का? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT