Kirit Somaiya vs Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

Kirit Somaiya : मुश्रीफांच्या घरावरील ED च्या छाप्यानंतर सोमय्या पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर

मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करत किरीट सोमय्या यांनीच त्यांची ईडीकडं तक्रार केली होती.

सकाळ डिजिटल टीम

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं टाकलेल्या छाप्यानंतर आज पहिल्यांदाच सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज (सोमवार) कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर पाच दिवसांतच सोमय्या कोल्हापुरात आले आहेत.

त्यांच्या दौर्‍याला कोणीही विरोध करणार नाही, असं मुश्रीफांनी (Hasan Mushrif) स्पष्ट केलं असलं तरी त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळं कार्यकर्ते संतप्त आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्‍याकडं राज्याचं लक्ष लागलंय. ईडीच्या या छापेमारीनंतर सोमय्या आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये (Kolhapur) दाखल झाले आहेत. रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

विशेष म्हणजे, मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करत किरीट सोमय्या यांनीच त्यांची ईडीकडं तक्रार केली होती. मुश्रीफ यांच्या घरावर छापे पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर आणि कागलमध्ये किरीट सोमय्या यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आज सोमय्या हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.

ते आज सकाळी अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं टाकलेल्या छाप्यानंतर आज पहिल्यांदाच सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांचं कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत करण्यात आलं. आज अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर ते साडेअकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT