bjp leader samarjeetsinh ghatge altimet to maharashtra government 
कोल्हापूर

'मंत्र्यांप्रमाणे जनतेचीही वीज  बिले माफ करा नाहीतर जनता तुम्हाला शॉक दिल्याशिवाय राहणार नाही'

सकाळ वृत्तसेवा

हुपरी  -: वाढीव वीज बिले माफ करण्याचे जनतेला दिलेले आश्वासन वाऱ्यावरच असताना दुसरीकडे डझनभर मंत्र्यांना वीज बिलेच द्यायची नाहीत.  हा कसला राज्य कारभार, असा सवाल करत मंत्र्यांप्रमाणे जनतेचीही वीज  बिले माफ करा नाहीतर जनता तुम्हाला शॉक दिल्याशिवाय राहणार नाही,  असा इशारा छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे  जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी रांगोळी येथे दिला.

रांगोळी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची जनपंचायत शिवार संवाद आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती महावीर गाट होते. माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट, इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष तानाजी पवार,  जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, अरुण इंगवले, सरपंच नारायण  भोसले, अनिल काळे, विजय माळी, मोहन वाईंगडे, अमृता भोसले आदी उपस्थित होते.

सुरेश हाळवणकर म्हणाले,‘‘देतो देतो म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना फसवत आहे.’’ 

किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, डॉ. अश्विनी नवगरे, शिवाजी माने, प्रकाश पाटील, जयवंत सादळे, अनिल शिरोळकर, संभाजी मोरे, जयपाल पाटील आदींची भाषणे झाली. स्वागत अमित गाट यांनी केले. प्रवीण शेट्टी यांनी आभार मानले.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Letter to PM Modi : नाना पटोलेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र!, निवडणुकांआधी काँग्रेसने खेळलं 'मराठी कार्ड'

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

SCROLL FOR NEXT