Shoumika Mahadik vs MLA Satej Patil esakal
कोल्हापूर

15 वर्षे आमदार, 8 वर्षे मंत्री असणाऱ्यांना काळे झेंडे दाखवले का? 'हद्दवाढ'प्रश्‍नी शौमिका महाडिकांचा आरोप

मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ करण्याची अधिसूचना घेऊन कोल्हापुरात यावे, अशी मागणी हद्दवाढ कृती समितीतर्फे केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

उत्तरमधून कृष्णराज महाडिक यांचे नाव येत आहे. एकाच घरात खासदार आणि आमदार अशी टीका होऊ शकते, या प्रश्‍नावर महाडिक म्हणाल्या, हे पक्ष, कार्यकर्ते ठरवतात.

कोल्हापूर : शहर हद्दवाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना काळे झेंड दाखवण्यापेक्षा काँग्रेसच्‍या शहराध्यक्षांनी पंधरा वर्षे आमदार आणि आठ वर्षे मंत्री असणाऱ्या त्यांच्या नेत्यांना (सतेज पाटील) कधी काळे झेंडे दाखवले आहेत का? महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हद्दवाढ का केली नाही? पंधरा वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीने कोल्हापूरसाठी काहीही केले नाही, असा आरोप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी केला.

आमदार सतेज पाटील (MLA Satej Patil) यांनी दक्षिण मतदारसंघातील त्यांना मानणाऱ्या आणि हद्दवाढीत समाविष्ट असणाऱ्या गावांचा हद्दवाढीच्या समर्थनात ठराव घ्यावा, असे जाहीर आव्हानही महाडिक यांनी केले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

महाडिक म्हणाल्या, ‘मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ करण्याची अधिसूचना घेऊन कोल्हापुरात यावे, अशी मागणी हद्दवाढ कृती समितीतर्फे केली जात आहे. याचवेळी हद्दवाढ विरोधी कृती समितीची मतेही जाणून घ्यावे. आमदार अमल महाडिक यांनी अमृत योजनेतून ३५० कोटी रुपयांचा निधी आणला. हा निधी महानगरपालिकेने कसा खर्च केला. त्यातून शहराचा कोणता विकास केला, हे सांगावे.

उत्तरमधून कृष्णराज महाडिक यांचे नाव येत आहे. एकाच घरात खासदार आणि आमदार अशी टीका होऊ शकते, या प्रश्‍नावर महाडिक म्हणाल्या, हे पक्ष, कार्यकर्ते ठरतात. सध्या एकाच घरात दोन आमदार आहेतच, अशी टीका आमदार सतेज पाटील, आमदार ऋुतुराज पाटील यांच्यावर केली. राजारामचे संचालक तानाजी पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT