Rohit Patil 
कोल्हापूर

"...तर भाजपला भीमटोला देण्याची गरज"; कोल्हापुरातील पवारांच्या सभेत रोहित पाटील आक्रमक

यावेळी रोहित पाटील यांनी चहुबाजूंनी भाजपवर हल्ला चढवला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवारांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. आज कोल्हापुरात सभा पार पडत आहे. या सभेत राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. (BJP needs to give Bhimtola Rohit Patil aggressive in Kolhapur NCP Rally)

देशविघात शक्तींचं देशात राज्य

रोहित पाटील म्हणाले, "आज देशात विघातक प्रवृत्ती जन्माला येत आहे. ज्यांनी देशात भांडणं लावली, ज्यांनी जाती-जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचा, देश तोडण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांच्या हाती आपल्या राज्याची आणि देशाची सत्ता आहे. (Latest Marathi News)

भाजपच्या राज्यात महापुरुषांचा अपमान

भाजपच्या राज्यात महापुरुषांचा अपमान होताना आपण पाहात आहोत. कोणीही उठतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतं. कोणीही उठतं आणि शाहू-फुले-आंबेडकरांचा अपमान होईल अशी वक्तव्य करत असतात. त्यामुळं या पुरोगामी महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला याचा राग आला पाहिजे.

भीमटोला देण्याची गरज

ज्या महाराजांनी मराठी माणसाचा पाठीचा कण ताठ ठेवायला शिकवलं, ज्या आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला. ज्या फुले दाम्पत्यानं सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला अशा लोकांचा जर अपमान होत असेल तर येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत आपण सर्वांनी भाजपला भीमटोला देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT