BJP On Zero In Gadhinglaj Municipality Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज पालिकेत भाजप शून्यावर 

अजित माद्याळे

गडहिंग्लज : गेल्यावेळच्या पालिका निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले. पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण होण्यापूर्वीच दोन्ही नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने पालिकेतील भाजपचे बलाबल शून्यावर आले आहे. वर्षापूर्वी शशिकला पाटील जनता दलाच्या, तर दोन दिवसांपूर्वीच दीपक कुराडे राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले. एकाच प्रभागातील या दोन्ही नगरसेवकांनी परस्परविरोधी पक्षात प्रवेश केला आहे. या घटनेने भाजपला धक्का बसला आहे. 

पूर्वीपासून गडहिंग्लज पालिकेची सत्ता कॉंग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या भोवतीच फिरत आली आहे. एकदा सर्वपक्षीय महालक्ष्मी विकास आघाडीला सत्ता मिळाली. शिवसेना आणि भाजपला सत्तेपर्यंत पोचण्याइतके यश येथे आतापर्यंत मिळवता आलेले नाही. एखाददुसरा नगरसेवक निवडून येण्यापुरते त्यांचे अस्तित्व राहिले. पालिकेची गेल्यावेळची पंचवार्षिक निवडणूक शिवसेना-भाजप युतीने लढविली. त्यात भाजपचे दोन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक सभागृहात दाखल झाला. जनता दल सत्तेत विराजमान झाले. त्याच वेळी युतीच्या तिन्ही नगरसेवकांनी जनता दलाला पाठिंबा देत सत्तेत सहभाग नोंदवला. 

पालिका निवडणूक झाली तेव्हा राज्यात भाजप-सेनेचीच सत्ता होती. या सरकारकडून शहरासाठी विकास निधी मिळेल, या अपेक्षेने जनता दलानेही युतीला पालिका सत्तेत सामावून घेतले; परंतु अपेक्षित असा भरघोस निधी मिळालाच नाही. यामुळे जनता दलाचा हिरमोड झालाच, शिवाय भाजपच्या नगरसेवकांनाही त्यांच्या प्रभागासाठी एक पैचाही निधी मिळाला नाही. याचेच पर्यवसान दोन्ही नगरसेवकांच्या पक्षांतरात झाल्याची चर्चा आहे. ही खंत कुराडे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळीही जाहीरपणे बोलून दाखविली. 

कारणांचे चिंतन आवश्‍यक 
यंदा नोव्हेंबरमध्ये पालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या रिंगणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीविरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी निश्‍चित मानली जाते. घाटगे यांना आता पालिका निवडणुकीसाठी वेगळी व्यूहरचना करून नव्याने मांडणी करावी लागणार आहे. त्यासोबत दोन्ही नगरसेवकांनी पक्ष सोडल्याच्या कारणांचे चिंतनही आगामी काळात सर्वांनी करण्याची आवश्‍यकता आहे. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

SCROLL FOR NEXT