BJP's March On MSEDCL In Hupari Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

हुपरीत भाजपचा महावितरणवर मोर्चा 

बाळासाहेब कांबळे

हुपरी : भाजपतर्फे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरण कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. महावितरण हुपरी विभागाचे कार्यकारी अभियंता कसबेकर यांनी मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. 

हुपरीसह परिसरातील रेंदाळ, यळगूड, रांगोळी, तळंदगे, जंगमवाडी, पट्टणकोडोली इंगळी आदी गावातील भाजपचे कार्यकर्ते रांगोळी येथे एकत्र आले. तेथून मोर्चाने येथे येत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मारला. जोरदार घोषणाबाजी केली. सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने आदींनी विना मीटर जोडणी आहे तेथे जोडभार तपासून बिले दुरूस्त करावीत, मीटर सुरू आहेत तेथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन रिडींग घेऊन बिले दुरूस्त करावीत, मीटर बंद आहेत तेथे मागील वापराची सरासरी काढून बिले आकारावीत, मीटर पूर्ण बंद असलेल्या ठिकाणी फिडरवरून दिलेली वीज व फिडरवरील खरा जोडभार या आधारे सरासरी वीज वापरानुसार बिले निश्‍चित करावीत, थकीत बिलावरील व्याज व दंडाची रक्कम विनाअट रद्द करावी, वीज वसुलीसाठी साखर कारखाना, पतसंस्था, सोसायटी, ग्रामपंचायत यांना फ्रंचायजी देण्याची योजना महावितरणने राबवू नये आदी मागण्यांचे निवेदन अधिकारी कसबेकर यांना दिले.

कसबेकर यांनी वीज कनेक्‍शन तोडणार नाही तसेच ज्या घरगुती ग्राहकाचे वीज बिल चुकीचे आहे त्यांचे दुरूस्त करून हप्त्याने भरून घेतले जाईल, असे लेखी पत्र दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. 
आंदोलनात नगरसेवक रफिक मुल्ला, रेंदाळचे सरपंच विजय माळी, वीरकुमार शेंडुरे, सुभाष कागले, डॉ. सुभाष मधाळे, प्रकाश पाटील, डॉ. सचिन मेथे, लक्ष्मण चनगुंडी, पप्पू मगदूम, श्रुतिक पाटील, प्रवीण रांगोळे, अमित एकांडे, आकाश राणे आदींनी भाग घेतला. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त होता. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT