black bubbles karnataka police 
कोल्हापूर

काळ्या फुग्यांची कर्नाटक पोलिसांना धास्ती 

मिलिंद देसाई

बेळगाव : काळ्या दिनी निषेध नोंदविण्यासाठी आकाशात काळे फुगे सोडण्याच्या आवाहनाची  कर्नाटक पोलिसांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. गुरुवारी पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांना बोलावून एक नोव्हेंबर रोजी काळे फुगे व पतंग आकाशात सोडू नका अशा सूचना करत कार्यकर्त्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू केला.


खडे बाजार पोलिस स्थानकात युवा समितीचे कार्यकर्ते व पोलिस अधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक धिरज शिंदे यांनी निषेध नोंदविण्यासाठी काळे फुगे आकाशात सोडू नये तसेच समितीचे वरिष्ठ अधिकारी जो निर्णय घेतील त्या प्रमाणे त्या दिवशी कार्यक्रमात भाग घ्यावा असे सांगत कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवा समितीचेअध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, समितीचे कार्यकर्ते अनेक वर्षे लोकशाहीच्या मार्गाने लढा देत असून या पुढेही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केले जाणार आहे, मराठी भाषिकांकडून काळ्या दिनी कायद्याच्या चौकटीत राहून निषेध नोंदवला जाणार आहे. 

यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सचिव श्रीकांत कदम, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीवेळी चंद्रकांत पाटील, रोहित गोमानाचे, रोहन लंगरकांडे, अश्वजित चौधरी, सूरज कुडूचकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

गेल्या काही दिवसांपासून समितीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गाने एक नोव्हेंबर रोजी निषेध नोंदविण्याची तयारी करीत असून सोशल मीडियावरून काळ्या दिनाबाबत जनजागृती केली जात आहे. यालाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरू केली आहे. मात्र कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती जो निर्णय घेईल त्या प्रमाणे निषेध नोंदविण्याचा निर्धार केला आहे

.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E. Coli Bacteria: मुंबई रेल्वे स्थानकातील पाणी पिताय, जरा जपून! मध्य रेल्वेच्या ३ स्थानकात पाण्याच्या टाकीत आढळतोय 'हा' भयानक विषाणू

IND vs SL 1st Test: 'आता, सर्व तलवार चालवणार!'; रिषभ पंत लाईव्ह मॅचमध्ये रवींद्र जडेजाला असं का म्हणाला? Video Viral

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन बांगलादेशी ताब्यात; अनधिकृत वास्तव्य उघड, ढाब्यावर कुक-वेटर म्हणून काम, धक्कादायक सत्य समोर..

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Nag Panchami 2026: पृथ्वीवर नागकुळाची निर्मिती कशी झाली? जाणून घ्या नागदेवतेच्या जन्माची अद्भूत कथा..

SCROLL FOR NEXT