black magic Atrocities on women Crime against three including two from Sawantwadi 
कोल्हापूर

सिरसंगीच्या देवर्षीने करणीच्या बहाण्याने महिलेवर केला अत्याचार: सावंतवाडीतील दोघांसह तिघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नेसरी (ता. गडहिंग्लज) (कोल्हापूर)  : मी संताचा अवतार असून, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. तुमच्या घरी करणी केल्याचे सांगत सिरसंगी (ता. आजरा) येथील देवर्षीने एका विवाहितेवर सहा वर्षांपासून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विवाहितेने याबाबतची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात दिली. बाळू धोंडिबा दळवी असे अटक केलेल्या देवर्षीचे नाव आहे. त्याला सोमवार (ता. १४)पर्यंत कोठडी मिळाली आहे. जादूटोणा करण्यासाठी दळवीला मदत करणाऱ्या लक्ष्मण सुतारसह सावंतवाडीच्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत नेसरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी 

दळवी स्वत:ला संताचा अवतार समजतो. त्याने सिरसंगी येथे मंदिरही बांधले आहे. आजऱ्यासह गडहिंग्लज तालुक्‍यातील भक्त मोठ्या प्रमाणात तेथे जातात. या भक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी दळवी दरबार भरवतो. यातून दळवी व पीडित महिलेची ओळख झाली. तुमच्या घरावर करणी झाली आहे. तुमच्या घरात सोन्याचा खजिना आहे. मी, तो तुम्हाला मिळवून देतो. त्यामुळे मी जे सांगतो तसे तुम्ही ऐका असे सांगत दळवीने पीडित महिलेवर जादूटोणा केला. पीडितेच्या घरी डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०२० या कालावधीत अत्याचार केला. त्याला लक्ष्मण सुतारसह सांवतवाडी येथील अन्य दोघांनी मदत केली आहे. 


पीडित महिलेने याबाबतची फिर्याद आज येथील पोलिस ठाण्यात दिली. जादूटोणा प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. नेसरी पोलिसांनी सिरसंगी येथून बाळू दळवीला अटक केली. गडहिंग्लज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे अधिक तपास करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT