Black market of ration grains in nipani 
कोल्हापूर

तांदूळ शिजेना अन् चपाती होईना ; मोफत धान्याने केली अशी डोकेदुखी...

राजेंद्र हजारे

निपाणी - 'कोरोना' महामारीला रोखताना सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात रेशनवरील धान्य पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासन पेलत आहे. रेशनच्या धान्याचा होणारा काळाबाजार ऐन कोरोनाच्या महामारीतही संपलेला नाही. तरीही सर्वसामान्य कुटुंबांना दरडोई ७ ते १० किलो तांदूळ आणि प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना ४ किलो गहू मोफत दिले जात आहे. पण रेशनचा तांदूळ शिजत नाही. तर गहू दळून आणल्यानंतर त्यापासून चपात्या करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने शहर आणि ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एप्रिल महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत तांदूळ आणि गहू पुरवठा करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा मिळाला असला तरी वितरित होणारे तांदूळ आणि गहू बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी भिजलेला तांदूळ आणि गहू वितरित केले जात आहे. तर गहू भिजल्याने त्याला बुरशी येण्यासह काळा रंग आला आहे. त्यामुळे एका कुटुंबातील ४ किलो गहू पैकी स्वच्छ केल्यानंतर केवळ अडीच किलो गहू लाभार्थींच्या उपयोगासाठी पडत आहे. तर तांदूळ कठीण असल्याने बऱ्याचदा पाणी घालूनही जात नसल्याने तळातून भात करपण्याचे प्रकार घडत आहेत.

तसेच मोफत धान्यासाठी दिवसभर भर उन्हात रांगेत थांबून धान्य घेऊनही त्याचा खाण्यासाठी वापर होत असल्याने संतापाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सध्या अंत्योदय कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्याचा पुरवठा होत असला तरी त्याचा खाण्यासाठी वापर न होता जनावरांसाठी द्यावा लागत आहे. त्यामुळे शासनाने सर्वसामान्य कुटुंबांना पुरवठा करीत असलेल्या धान्याचा दर्जा चांगला ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

कारवाईची मागणी

काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये गव्हाचा दर्जा चांगला असल्याने आटा बनवणाऱ्या काही व्यावसायिकांनी रेशन दुकानदारांची संपर्क साधून गव्हाची मागणी करू लागले आहेत. तर काही रेशन दुकानदार त्यांना लाभार्थींचा गहू विक्री करत असल्याचेही दिसून येत आहे. शहर आणि ग्रामीण भागात अशा घटना घडत असतानाही येथील तहसीलदार मात्र बैठकांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे अशा दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी लाभार्थीतून होत आहे.
 

'चार दिवसापूर्वी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी ९ किलो तांदूळ आणि कुटुंबाला ४ किलो गहू मिळाले आहेत. पण तांदूळ शिजत नसून गावापासून चपात्या ही बनवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे धान्य सर्वसामान्यांना पुरवठा करण्याची गरज आहे.'
-पार्वती ठाणेकर,
आंदोलन नगर, निपाणी

'शासनातर्फे दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य दिले जात आहे. पण काही ठिकाणी गहू आणि तांदळाची प्रत कमी दर्जाची असल्याची तक्रार आली आहे. त्याबाबत योग्य निर्णय घेऊन चांगल्या दर्जाचे धान्य वितरीत केले जाईल.'
- एम. बी. डंगी,
निरीक्षक अन्न व नागरी पुरवठा खाते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीच्या 4 हजार एकर इनामी जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT