blast in shiroli MIDC factory one person injured but he dead in kolhapur 
कोल्हापूर

भट्टीतील लावारस अंगावर उडाल्याने जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू

अभिजीत कुलकर्णी

नागाव (कोल्हापूर) : शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका फाउंड्री उद्योगात फर्नेस भट्टीचा स्फोट होऊन जखमी झालेल्या कामगाराचा आज सकाळी उपचार सुरू असताना सीपीआर येथे मृत्यू झाला. प्रकाश दिनकर पोद्दार (वय २५, रा. जोशी नगर, संभाजी नगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : रविवारी (ता. १७) वसाहतीमधील एका फाउंड्री उद्योगातील फर्नेस भट्टीचा अचानक ब्लास्ट झाला. यामुळे भट्टीतील लावारस उद्योगाच्या क्षेत्रात इतरत्र पसरला. यातीलच काही लावारस प्रकाश पोतदार या कामगारांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आज उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर येथे नेण्यात आला होता. मात्र याबाबत कोणताही पंचनामा न झाल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध करत आंदोलन केले. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT