blind Rina of Visapur became a one-day police commissioner 
कोल्हापूर

विसापूरची अंध रिना बनली एक दिवसाची पोलिस आयुक्त

अनिता माने

विसापूर (जि. सांगली) : येथील दृष्टिहीन असलेल्या रीना पाटील या एक दिवसासाठी पोलिस आयुक्त बनल्या. पिंपरी-चिंचवड विभागाचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी हा बहुमान त्यांना प्रजासत्ताकदिनी दिला. पोलिस आणि नागरिकांतील दरी कमी व्हावी. सुसंवाद वाढावा यासाठी कृष्ण प्रकाश यांनी हा उपक्रम राबवला.

दोन्ही डोळ्यांनी अंध रिना यांना ही जबाबदारी मिळाल्याने खूप आनंद झाला. त्यांच्या धैर्याचे कृष्ण प्रकाश यांनी कौतुक केले. दरम्यान, पोलिसांचे संचलन करतानाची छायाचित्रे समाज माध्यमावर व्हायरल होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. भार्गव पाटील विकास सोसायटीचे स्वस्त धान्य दुकान चालवतात. त्यांना रीनासह चार मुली आहेत. रीना दोन्ही डोळ्यांनी जन्मांध आहे. वडिलांनी पुणे येथे पाचव्या वर्षीच अंधशाळेत प्रवेश घेऊन दिला.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातच एका बॅंकेत त्यांना नोकरी मिळाली. नोकरी करत असतानाच त्यांचे समाजकार्यही सुरू होते. जवळच्याच अंध मैत्रिणीचा विवाह लावून दिला. गावात सामाजिक उपक्रम राबविताना विविध व्याख्यानांबरोबर कीर्तने आयोजित करतात. अमेरिकेसह कुवेतचा परदेश दौराही त्यांनी केला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील व्याख्यानमालेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. 

नागरिक व पोलिसांत सुसंवाद वाढावा, पोलिसांबद्दलचा आदर वाढून समाजात भीती कमी व्हावी, पोलिसांची कर्तव्ये, कामाच्या पद्धती याचा अनुभव नागरिकांनी घ्यावा, या उद्देशाने कृष्ण प्रकाश यांनी सामान्य नागरिकांना एक दिवसासाठी पोलिस अधिकारी बनविण्याचा उपक्रम राबवला आहे. यात रिना यांना एक दिवस पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. 

आयुक्त पदावर काम केल्याच्या रोमांचक अनुभवाबद्दल बोलताना रिना म्हणाल्या, ""तुम्हाला एक दिवस अधिकारी बनायचे आहे. असा फोन मला आयुक्त कार्यालयातून आला. पोलिस म्हणून काम करणार असल्याने मी भारावून गेले. डॅशिंग व भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या खुर्चीवर बसण्याचा प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय होता.'' 

हा अंधांचा सन्मान! 
प्रजासत्ताकदिनाचे संचलन, गाडीत बसण्याची ऐट आणि वर्दी परिधान केल्यानंतर त्याचे समजलेले महत्त्व वेगळाच अनुभव होता. या सन्मानामुळे अंधांचे समाजातील स्थान आणखी उंच झाले, असे रिना पाटील म्हणाल्या. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT